पुण्यात पुन्हा भरदिवसा गाडीच्या काचा फोडून चोरी

pune-111.jpg
pune-111.jpg

पुणे : रस्त्याच्याकडेला लावलेल्या गाडीच्या काचा फोडून अनोळखी व्यक्तींनी गाडीमधील महत्वाची कागदपत्रे, क्रेडीट कार्ड, रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) जिल्हाध्यक्ष राहुल पोकळे यांची  ही फॉर्च्युनर कार होती. ही घटना भरदिवसा डेक्कन बसस्थानकासमोरील वर्दळीच्या ठिकाणी शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजता घडली.

पोकळे व त्यांच्या पत्नीसमवेत त्यांच्या फॉर्च्युनर गाडीमधून एका कार्यक्रमानिमित्त डेक्कन येथे आले होते. दोघेही डेक्कन येथे पीएमपीएल बसस्थानकासमोर उतरुन एका खासगी कार्यक्रमासाठी गेले. त्यांच्या चालकाने गाडी रस्त्याच्या बाजुला लावली आणि ते जवळील स्वच्छतागृहात गेले. चालक माघारी परतल्यानंतर त्यांना पोकळे यांच्या गाडीच्या काचा फोडून आतमध्ये ठेवलेली महत्वाची कागदपत्रे, भाषणांचे मुद्दे, पुस्तके, क्रेडीट कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. चालकाने याबाबत पोकळे यांना खबर दिली. त्यानंतर पोकळे व त्यांच्या पत्नी तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. पोकळे यांनी याबाबत डेक्कन पोलिसांना माहिती दिली. 

"पत्नी व मी कार्यक्रमासाठी डेक्कनला आला होतो. त्यावेळी माझ्या गाडीच्या काचा फोडून आतमधील महत्वाच्या वस्तु चोरुन नेल्या. त्यामध्ये माझ्या पक्षाच्या, संघटनेच्यासंबंधीत महत्वाची कागदपत्रे, भाषणे, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडीट कार्ड व अन्य महत्वाचा ऐवज चोरुन नेला आहे. दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्यामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे.'' 
- राहुल पोकळे, जिल्हाध्यक्ष, शेकाप.


पुण्यात गाड्या फोडून चोरीचे सत्र सुरुच
जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता व डेक्कन परिसरामध्ये महागड्या गाड्यांच्या काचा फोडून तसेच चालकांची दिशाभुल करुन वाहनांमधील मौल्यवान वस्तु, रोकड नेण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. काही महिन्यापुर्वीच कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीमध्येही याच पद्धतीने चोरी करण्यात आली होती. त्यानंतर एका वृद्ध नागरिकासही फसवून त्याच्या गाडीमधील मौल्यवान वस्तु चोरीस गेल्या होत्या. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com