६१ व्या वर्षी दशरथ जाधव 'फूल आयर्नमँन'

कृष्णकांत कोबल
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मांजरी : कर्तृत्व गाजवायला ना वयाचं बंधन असते ना परिस्थितीचं. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर ते निश्चितपणे स्वतःला सिध्द करता येतच असते. हडपसर येथील उद्योजक दशरथ जाधव यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी जर्मनी हॅम्बर्ग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सहभागी होऊन "फूल आयर्नमँन' होण्याचा मान मिळविला आहे. वल्ड ट्रीएथलोन काँर्पोरेशनने (डब्ल्युटीसी) या स्पर्धेचे आयोजन केले होते.

मांजरी : कर्तृत्व गाजवायला ना वयाचं बंधन असते ना परिस्थितीचं. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर ते निश्चितपणे स्वतःला सिध्द करता येतच असते. हडपसर येथील उद्योजक दशरथ जाधव यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी जर्मनी हॅम्बर्ग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सहभागी होऊन "फूल आयर्नमँन' होण्याचा मान मिळविला आहे. वल्ड ट्रीएथलोन काँर्पोरेशनने (डब्ल्युटीसी) या स्पर्धेचे आयोजन केले होते.

सुमारे चार किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे व ४२ किलोमीटर धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. त्यासाठी चौदा तास पन्नास मिनिटे अशी निर्धारित वेळ होती. मात्र, जाधव यांनी हा सर्व क्रिडा प्रकार बारा तास अठ्ठावन्न मिनिट असा दोन तास अगोदरच पूर्ण केला. जगभरातील विविध सत्तर देशातील हजारो स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यातील २१०० जण या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली होती. त्यामुळे त्यामध्ये तरुणांचा सहभाग मोठा होता. निर्धारित वेळेत दिलेले अंतर पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना "फूल आयर्नमँन' म्हणून घोषित करण्यात आले. त्यामध्ये जाधव यांनी ६१ व्या वर्षी हा मान मिळविला आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेसाठी गेली सहा महिन्यांपासून ते कौस्तुभ राडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते. गेल्यावर्षी मलेशिया येथे झालेल्या या स्पर्धेत "हाल्फ आयर्नमँन' चा मान त्यांनी मिळविला होता.

दशरथ जाधव हे गेली अनेक वर्षांपासून बिर्ला सिमेंट कंपनीसाठी डीलर म्हणून एसपी ट्रेडर्स नावाने फर्म चालवीत आहेत. या क्षेत्रातही त्यांना कंपनीकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एवढा मोठा व्याप सांभाळत असतानाही त्यांनी सायकलींग सारखा छंद जोपासला आहे. आठवड्यातून तीन दिवस साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रवास ते सायकलवरून करीत आहेत. 

पुणे ते दिल्ली व पुणे ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास त्यांनी व त्यांच्या टीमने केला आहे. या प्रवासात मार्गावरील विविध शहरे, छोटीमोठी गावे व वस्त्यांमध्ये जाऊन या सर्वांनी बेटी बचाओ- बेटी पढाओ, पर्यावरण संवर्धन याबाबत जनजागृतीही करण्याचे काम केले आहे. 

"सायकलिंग हा माझा व माझ्या अनेक मित्रांचा छंद झाला आहे. कुठलेही व्यसन न करता गेली एकवीस वर्षांपासून मांसाहार व चहा वर्ज केला आहे. केवळ आवश्यक शाकाहाराने  व नियमित व्यायामाने चांगले आरोग्य आपण जपू शकतो. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे कोणतीही गोळी औषधे न घेता उतार वयातही आरोग्यसंपन्न राहत आहे. माझ्या सोबत पंचवीस वर्षाच्या रूणांपासून सत्तरीकडे झुकलेले अनेकजण अशी जीवनशैली जगत आहेत. यामध्ये सर्वजण नोकरी व्यवसाय सांभाळणारे आहेत. त्यासाठी वेळेचे कारण न सांगता सर्वांनी व्यायामाची सवय अंगिकारली पाहिजे."
- दशरथ जाधव, आयर्नमँन 

Web Title: At age of 61 dasharath jadhav become full Ironman