बारामतीत राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दुधदर वाढीसाठी आंदोलन

संतोष आटोळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

तालुका अध्यक्ष अ‍ॅड अमोल सातकर म्हणाले, ''दुध दर वाढीसाठी सरकार ला निवेदन दिले, नंतर पांडुरंगाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घातला तरी, देखील या सरकारला जाग येत नाही. सरकार दुध विषयावर बोलायला देखील तयार नाही. यामुळे आज रस्त्यावर दुध ओतुन देण्याची वेळ आली आहे.

शिर्सुफळ : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने बारामती एमआयडीसी येथील पेन्सिल चौक दुधाला वाढीव भाव मिळावा यासाठी गरीब जनतेमध्ये दुध वाटून व उर्वरित दुध रस्त्यावरती ओतून शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारचा निषेध करीत दुधाला दरवाढ देण्याची मागणी करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी तालुका अध्यक्ष अ‍ॅड अमोल सातकर म्हणाले, ''दुध दर वाढीसाठी सरकार ला निवेदन दिले, नंतर पांडुरंगाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घातला तरी, देखील या सरकारला जाग येत नाही. सरकार दुध विषयावर बोलायला देखील तयार नाही. यामुळे आज रस्त्यावर दुध ओतुन देण्याची वेळ आली आहे. कसलं हे सरकार आहे किती आंदोलन केली तरी, या सरकार जाग येत नाही झोपेचे सोंग घेतलेले हे सरकार आहे या पुढे सरकारने दुधाला भाव वाढवून नाही दिला तर अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल आसा इशारा देण्यात आला.''

Big Breaking : सौरभ राव यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला​

या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष माणिकराव दांगडे, आण्णासाहेब रूपनवर, विठ्ठल देवकाते, काका बुरूंगले, शैलेश थोरात,लखण कोळेकर, अविनाश मासाळ, अजित मासाळ,गिरीधर ठोंबरे, महादेव कोकरे, घनशाम देवकाते, हणमंत देवकाते, दशरथ आकळे, अमोल चोपडे, किशोर सातकर, भुषण सातकर, निखील दांगडे, आकाश जमदाडे, राहुल सातकर, आकाश देवकाते यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आता तुमची दहावीची शाळा भरणार तुमचा अकरावीचा अॅडमिशन फॉर्म!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation for increase in milk prices on behalf of Rashtriya Samaj Party In Baramati