esakal | फी कपातीसाठी ई-मेल भेजो आंदोलन; सुविधा वापरणारच नाही पैसे का द्यायचे?
sakal

बोलून बातमी शोधा

agitation to send email to Uday Samant for 40 percent fee reduction

- शुल्क कपात करण्यासाठी ईमेल भेजो आंदोलन
- ४० टक्के शुल्क कपात करण्याची मागणी
-उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना ईमेल

फी कपातीसाठी ई-मेल भेजो आंदोलन; सुविधा वापरणारच नाही पैसे का द्यायचे?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'मुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होत असतानाही महाविद्यालयांनी कॉलेज स्टेशनरी, लायब्ररी, कॉम्प्युटर, इंटरनेट यासह अन्य कारणांसाठी शुल्क आकारणी सुरू केले आहे. ज्या सुविधा विद्यार्थी वापरणारच नाही त्यासाठी पैसे का द्यायचे. त्यामुळे ४० टक्के शुल्क कपातीचा आदेश द्यावा यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना हजारो ईमेल पाठवून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षाची पदवी व पदवीव्युत्तर प्रवेश प्रक्रिया राज्यभरातील काही महाविद्यालयांनी सुरू केली आहे. हे प्रवेश करून घेत असताना महाविद्यालये विद्यार्थ्यांच्याकडून संपूर्ण फी वसूल करून घेत आहे. जर महाविद्यालय आॅनलाईनप्रणाली द्वारे शिक्षण देणार असतील,तर संपूर्ण फी विद्यार्थ्यांनी का भरायची ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच जर ऑनलाइन लेक्चर होणार असतील तर कॉलेज स्टेशनरी फी,लायब्ररी फी, कॉम्प्युटर फी, इंटरनेट फी,ˈक'ल्चरल् फी,अश्या विविध माध्यमातून राज्यभरातील महाविद्यालय फी वसूल करत आहेत.

माजी खासदार संजय काकडेंनी मेव्हण्याला दिली गोळ्या घालण्याची धमकी

लॉकडाउनमुळे अनेक पालक आर्थिक अडचणीत आहेत. विद्यार्थी डिसेंबर,जानेवारी पर्यंत महाविद्यालयात जाणार नाही तर मग एवढी फी का भरायची ? म्हणून ही वस्तुस्थिती उच्चतंत्र मंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी स्टुडंट हेल्पींग युनिटी माध्यमातून ई-मेल भेजो आंदोलन केले जात आहे. या आंदोलना द्वारे १० हजार ईमेल उच्च तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांना पाठवले जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

"विद्यार्थी शुल्क द्यायला तयार असतात, पण यंदा आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यातच ज्या सुविधा वापरणारच नाही त्यासाठी पैसे कशासाठी मागितले जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सरसकट ४० टक्के शुल्क कपातीचा निर्णय घ्यावा. "
- आकांक्षा चौगुले, अध्यक्षा, स्टुडंट हेल्पींग युनिटी

loading image
go to top