esakal | भूकेने मरण्यापेक्षा उपोषण करून प्राण त्याग करू...नोकरीवरून काढलेल्या महिलांची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

SHIRSUFAL

बारामती वन विभागाच्या अधिकारात असलेल्या नर्सरीमध्ये गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असणाऱ्या वन विभागातील कंत्राटी महिलांना कामावरून कमी केले व वन विभाग परत कामावर घेत नाहीत. त्यामुळे या महिला मजुरांनी सोमवारपासून (ता. 27) बारामती वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

भूकेने मरण्यापेक्षा उपोषण करून प्राण त्याग करू...नोकरीवरून काढलेल्या महिलांची भूमिका

sakal_logo
By
संतोष आटोळे

शिर्सुफळ (पुणे) : बारामती वन विभागाच्या अधिकारात असलेल्या नर्सरीमध्ये गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असणाऱ्या वन विभागातील कंत्राटी महिलांना कामावरून कमी केले व वन विभाग परत कामावर घेत नाहीत. त्यामुळे या महिला मजुरांनी सोमवारपासून (ता. 27) बारामती वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

थरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...

या उपोषण आंदोलनामध्ये बारामती तालुक्यातील विविध गावांमधील दहा महिला मजूर सहभागी झाल्या आहेत. नर्सरीमध्ये मजूर म्हणून त्या गेल्या दहा वर्षापासून कार्यरत होत्या, परंतु अचानकपणे कामावरून काढून टाकल्यामुळे त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक फटका बसला आहे. सर्व महिला दारिद्र्य रेषेखालील आहेत. नोकरी गेल्यामुळे त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यामुळे पुन्हा कामावर घेतले जात नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचे या महिलांनी सांगितले. विविध राजकीय पदाधिकारी फक्त आश्वासने देतात, परंतु न्याय देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आळंदीत सुरू आहे धक्कादायक प्रकार, दिसली जागा की टाकला... 

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो. त्यांनी नियमानुसार कामावर घ्या निधी किंवा अनुदानाबाबत पूर्तता केली जाईल, असे अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा अधिकारी कामावर रुजू करून घेत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुकेने मरण्यापेक्षा उपोषण करून प्राण त्याग करू, असे उपोषणकर्त्या सविता झगडे यांनी सांगितले.

मंदिर बंद असले तरी या ग्रामस्थांनी अशी सांभाळली परंपरा... 

शासनाने अद्याप अनुदान दिले नाही, काम सुरू करण्याची मंजुरी दिली नाही. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निधी व मंजुरीसाठी पाठपुरावा करत आहोत. निधी व मंजुरी प्राप्त होताच सर्व महिलांना कामावर पुन्हा घेऊ, असे लेखी आश्वासन दिले आहे. याबाबतच्या प्रति उपविभागीय अधिकारी, पोलिस निरिक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत. उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच, सदर बाब पुणे औद्योगिक कामगार न्यायालय येथेही न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे वरिष्ठांचे आदेश आल्यास त्यांना कामावर घेऊ. 
 - राहुल काळे, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी, बारामती