Garudzep Campaign : आग्रा ते राजगड पायी मोहिमेचे किल्ले राजगड पायथ्यास जल्लोषात स्वागत

आग्रा येथून १७ ऑगस्ट रोजी सुरू झालेली गरुड झेप मोहीम १३ दिवसांत १२५३ अंतर पायी चालत शिवभक्तांनी हाती ज्योत घेऊन प्रवास पार करत २९ ऑगस्ट रोजी राजगड किल्ल्यावर येऊन थांबली.
Garudzep Campaign
Garudzep CampaignSakal

वेल्हे, (पुणे) - छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून सुखरूप राजगडावर पोहोचले. या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिमेचे किल्ले राजगड पायथा खंडोबाचा माळ येथे मंगळवार (ता.२९) रोजी ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आग्रा येथून १७ ऑगस्ट रोजी सुरू झालेली गरुड झेप मोहीम १३ दिवसांत १२५३ अंतर पायी चालत शिवभक्तांनी हाती ज्योत घेऊन प्रवास पार करत २९ ऑगस्ट रोजी राजगड किल्ल्यावर येऊन थांबली. मोहिमेचा आग्रा (उत्तर प्रदेश) राजस्थान, मध्यप्रदेश ,या चार राज्य ५७ शहरामधून प्रवास झाला या मोहिमेत १३२ गावातील १२८० तरुण सहभागी झाले होते.

मोहिमेचे हे ४ वर्ष होते

दुर्गराज राजगड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या मोहिमेचे नियोजन तसेच सहभागी झालेल्या शिवभक्तांचे स्वागत-सत्कार करण्यात आले. शिवभक्त मारुती गोळे यांना आग्रावीर म्हणून यावेळी गौरविण्यात आले. मोहिमेत सहभागी झालेल्या शिवभक्तांचे महिलांनी औक्षण केले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी स्वागतासाठी राजगड येथील खंडोबा माळावर गर्दी केली होती. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' 'जय भवानी जय शिवाजी' या जयघोषांनी राजगड परिसर निनादुन निघाला होता. राजगड येथील पद्मावती देवीची आरती कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुंडलीक महाराज गरुड यांच्या हस्ते करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार तरुणांपर्यंत पोहोचविणे, रक्तदाब आणि मधुमेह या शारीरिक व्याधींपासुन व्यायामाच्या माध्यमातून मुक्तता ही आमची मोहिमेची संकल्पना आहे. ऐतिहासिक संदर्भाचा विचार केला तर शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून १७ऑगस्ट रोजी सुटले होते.

बुध्दिचातुर्याने अनेक संकटांवर मात करत, अवघे नऊ वर्षे वयाच्या शंभुराजांना मथुरेत ठेवत, तापी-नर्मदा-गोदावरी नद्यांचे अथांग पात्र पार करत राजगडावर सुखरुप पोहोचले होते. शिवाजी राजांच्या या इतिहासाला मानवंदना देण्यासाठी आम्ही हा प्रवास करत आहोत असे आग्रावीर मारुती गोळे यांनी सांगितले.

दुर्गराज राजगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोरक्षनाथ शिर्के, उपाध्यक्ष लव्ही गावचे सरपंच शंकर रेणुसे, वांगणी गावचे उपसरपंच शिवाजी चोरघे, मार्गासनी गावचे माजी सरपंच विशाल वालगुडे, भगवान शिंदे, मारुती शिर्के, अनंता रेणुसे, सुर्यकांत भोसले, नाना दरडिगे, सुभाष दळवी, यशवंत पोळेकर, सुभाष जाधव, रामभाऊ दरडिगे, दिगंबर शिळीमकर, शिवाजी रेणुसे, नारायण रेणुसे, आण्णा रेणुसे, तानाजी भोसले, संतोष जाधव, रामभाऊ खरात, पांडुरंग दरडिगे, साखर गावचे शंकर रेणुसे, तसेच लव्ही बुद्रुक आणि पाल खुर्द येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com