मोठी बातमी : अग्रसेन पतसंस्थेच्या अध्यक्षांसह दहाजणांवर गुन्हा दाखल; 3 कोटींचे नियमबाह्य कर्ज वाटप

agrasen maharaj patsanstha fraud case registered khadki
agrasen maharaj patsanstha fraud case registered khadki
Updated on

पुणे : नियमबाह्य कर्ज वाटपप्रकरणी खडकीतील अग्रसेन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षांसह दहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधीत पतसंस्थेच्या लेखापरिक्षणात ३ कोटी ४१ लाख रुपयांचे नियमबाह्य कर्ज वाटप करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रसेन महाराज सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळाने २०१२ ते २०१८ याकालावधीत नियमबाह्य कर्ज वाटप केले. कर्जदारांची मालमत्ता संस्थेच्या नावाने तारण न ठेवता नियमबाह्य पद्धतीने ३ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्जवाटप केले. संशयित आरोपींनी संगमनत करून पतसंस्था व ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केल्याचे फिर्यादी यांनी केलेल्या लेखापरिक्षणात उघड झाले. त्यानंतर अपहार आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. एस. ठाकूर तपास करत आहेत.

याप्रकरणी अग्रसेन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश धरमचंद अग्रवाल (रा.खडकी बाजार), उपाध्यक्ष राजेश प्रेमचंद अग्रवाल (रा.कळस, विश्रांतवाडी), चिटणीस इंद्रकुमार पुरणमल बन्सल (रा.पिंपळे गुरव), संचालक संजयम मामनचंद अग्रवाल (रा.औंध रस्ता), किसन कपूरचंद अग्रवाल (रा.खडकी), शशीकांत पुरुषोत्तम जगताप (रा.दापोडी), मीना दीपक अग्रवाल (रा.खडकी), लिपिक ज्योती नागेश यादव (रा.पिंपळे गुरव), स्नेहल सुयोग हरिप, कविता तानाजी सागावे (दोघेही रा. पिंपळे गुरव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लेखापरिक्षक भगवंता बिडगर यांनी याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com