ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट पदविकेविषयी कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पुणे - कृषी क्षेत्रातील खते, बी-बियाणे, कीडनाशक, सिंचन आदी उद्योगांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात कुशल उमेदवार लागतात. या उद्योग, व्यवसायात असलेला वाढता वाव लक्षात घेता कौशल्यपूर्ण उमेदवार घडविणारा एक वर्षाचा ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ हा खास पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स ‘सिमॅसिस इंटरनॅशनल इंटरडिसीप्लिनरी लर्निंग सेंटर’ (एसआयआयएलसी) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अभ्यासक्रमाविषयी परिपूर्ण माहिती देणारी विशेष कार्यशाळा शनिवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता होणार आहे. 

या अभ्यासक्रमात कृषी तसेच इतर शाखेच्या पदवीधरांनाही प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठी आवश्‍यक कौशल्ये विकसित करणे, इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर भर दिला जाणार आहे. ‘एसआयआयएलसी’च्या पुण्यातील बाणेर रस्त्यावरील सकाळनगरमधील अद्ययावत संकुलात हा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. 

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये 
 नामांकित उद्योगांतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन 
 कृषी उद्योगात आठ महिने ऑन जॉब ट्रेनिंगद्वारे कामाचा अनुभव 
 विविध फील्ड व्हिजिटद्वारे शेतीसंबंधी व्यवसाय, उद्योग अभ्यासण्याची संधी 
 नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारा नोकरीच्या संधी 

सविस्तर माहितीसाठी संपर्क - ९१४६०३८०३२ 

Web Title: agree business management workshop SILC