जुन्नरला बुधवारी कृषी विभागाची शेतकरी कार्यशाळा

दत्ता म्हसकर
सोमवार, 30 एप्रिल 2018

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, तालुका कृषी अधिकारी,जुन्नर अंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या या कार्यशाळेत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती तसेच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची ओळख व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

जुन्नर : कृषी विभागाच्या वतीने बुधवार ता.2 रोजी पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात किसान कल्याण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सहाय्यक तालुका कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी दिली.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, तालुका कृषी अधिकारी,जुन्नर अंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या या कार्यशाळेत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती तसेच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची ओळख व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
तसेच पशुसंवर्धन व संलग्न विभागाच्या योजनांची माहिती देण्यांत येणार आहे.

यावेळी कृषी शास्त्रज्ञांचे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. तसेच पुरस्कारप्राप्त शेतक-यांचा सन्मान समारंभ देखील आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी कृषी मित्र,शेतकरी बचत गट सदस्य व शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून शेती विषयक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: agriculture training session in Junnar