पुणे - शेतकऱ्यांसाठी देश-विदेशांतील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, निविष्ठांच्या माहितीचा खजिना असलेले ‘अॅग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२६’ यंदा ९ ते १२ जानेवारीदरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे..‘सकाळ-अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी असते. तर कृषी उद्योजकांना आपली उत्पादने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीची सुवर्णसंधी असते. हे कृषी प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर येथे केंब्रिज स्कूलजवळील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या पटांगणावर होणार आहे..स्मार्ट शेती, एआय तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट सिंचन, शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअर उद्योग, ड्रीप, टिश्युकल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत आहेत..कृषी प्रदर्शनात देश-विदेशांतील नामवंत अॅग्रो ब्रॅण्ड्स एका छताखाली येत आहेत. त्याद्वारे बागायती, कोरडवाहू आणि संरक्षित शेतीमधील समस्यांवर उपाय सुचविले जाणार आहेत. याशिवाय पूर्वा केमटेककडून आयोजित केलेले वैविध्यपूर्ण फळ प्रदर्शन शेतकऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे. प्रदर्शनासाठी राज्य, परराज्य आणि विदेशांतील उद्योगांनी आपला सहभाग नोंदविला असून, मोजकेच स्टॉल शिल्लक राहिलेले आहेत..प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्येनामांकित कंपन्या, संशोधन संस्थांचा सहभाग.बॅंका, खते, कीटकनाशके, बियाणे उद्योगांचे स्टॉल्स.कृषी अवजारे, यंत्रे, ड्रीप, प्रक्रिया उद्योगांचा सहभाग.नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा आविष्कार.स्टॉल बुकिंगसाठी संपर्कअभय भोसले, ९१४५७११७७७,अजिंक्य साखरे, ८९५६१३२५९५.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.