मदनवाडी येथे अहिल्यादेवी जंयती साजरी 

प्रशांत चवरे
गुरुवार, 31 मे 2018

भिगवण : मदनवाडी(ता.इंदापुर) येथे अहिल्यादेवी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्वच पक्षातील प्रमुख मान्यवरांनी मदनवाडी चौफुला येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.

मदनवाडी येथील जय अहिल्या सेवा भावी संस्थेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सरपंच आम्रपाली बंडगर, तुकाराम बंडगर, सचिन बोगावत, अजिंक्य माडगे उपस्थित होते. 

कॉंग्रेस पक्षाच्या राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते अहिल्यादेवी यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी आमदार रामहारी रुपनवर, माजी सभापती रमेश जाधव, कर्मयोगीचे संचालक यशवंत वाघ, अशोक शिंदे, संजय देहाडे, संजय रायसोनी, जावेद शेख उपस्थित होते. तर भाजपच्या वतीने भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मारुती वणवे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वणवे, ज्ञानेश्वर मारकड, दिनेश मारणे, राजेंद्र जमदाडे आदींनी प्रतिमा पुजन करुन वंदन केले. कार्यक्रमाचे नियोजन कुंडलिक बंडगर, तेजस देवकाते, आबासाहेब बंडगर, ज्ञानेश्वर मारकड, धैर्यशील मारकड, प्रदीप वाघमोडे, आबा चितळकर आदींनी नियोजन केले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ahilyadevi jayanti celebrated at madanwadi