अहिल्यादेवी शाळा हेच माहेर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे - ‘खूप वर्षांनी अहिल्यादेवीत आल्यावर माहेरी आल्यासारखे वाटते. त्या वेळी खेळांमध्ये घेतलेला सहभाग, शाळेची शिस्त ह्या जुन्या आठवणींचा एक सुंदर चलचित्रपटच माझ्यासमोर उभा राहिल्यासारखा वाटतो. त्यामुळे आपल्या मनाला जे भावतं तेच करा,’’ असे म्हणत नृत्यांगणा शमा भाटे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते अहिल्यादेवी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे. अहिल्यादेवी शाळेत पार पडलेल्या स्नेहसंमेलनात पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक अनघा डांगे यांनी केला. अर्चना पंच यांनी सूत्रसंचालन केले.

मुख्याध्यापिका सुलभा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘केवळ अभ्यास म्हणजे यश नाही, तर सर्वांगीण विकास म्हणजेच यश. यासाठी प्रत्येकानेच विविध क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करायला हवी.’’ शाळा समितीच्या अध्यक्षा प्राची साठे यांनी मनोगतात सुभाषितांचा वापर करून जीवनातील साहित्य, संगीत, कला यांचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. स्नेहसंमेलनात पारितेषिक वितरणाबरोबरच मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Ahilyadevi School Shama Bhate