Hinjewadi Flat Ganja Farm : ‘AI’चा असाही गैरवापर!, पुण्यात हिंजवडीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये चक्क गांजाची शेती

Hydroponic Ganja Farming in Hinjewadi Flat : जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण? ; उच्च शिक्षित दोन तरुणांसह चौघांना अटक, पोलिसांनी केलं रॅकेट उध्वस्त
Pune police caught hydroponic ganja and literature.

Pune police caught hydroponic ganja and literature.

esakal

Updated on

Pune Hinjewadi hydroponic ganja farming : सध्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स अर्थात AIचा जमाना आहे, असं बोललं जातं. अनेक कामांमध्ये एआयचा वापर सुरू आहे. एवढचं नाहीतर एआय अनेक नोकऱ्यांवरही गदा आणणार असल्याचंही चित्र आहे. मात्र आता याच एआयचा गैरवापर कसा होत आहे, याचंही एक उदाहरण समोर आलं आहे.

पुण्यातील हिंजवडी भागात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये चक्क एआयच्या मदतीने हायड्रोपोनिक गांजाची शेती केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे कृत्य दोन एमबीए पदवीधरांकडून केलं गेलं आहे. याप्रकरणी आता खडकी पोलिसांनी या दोघांसह चार जणांना अटक केली आहे.

हिंजवडीत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये ओजीकुश प्रकारचा हायड्रोपोनिक गांजा तयार करून, त्याचा शहरभर पुरवठा करणारं हे रॅकेट पोलिसांना अखेर उध्वस्त केलं आहे. मूळचे छत्रपती संभाजीनगरचे अशलेल्या सुमीत देदवाल आणि अक्षय मेहर हे दोघेही एमबीए पदवीधर आहेत, त्यांना आता पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे.

Pune police caught hydroponic ganja and literature.
Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

या दोघांनी हिंजवडी सारख्या उच्चभ्रू भागातील एका भाड्याच्या एसी फ्लॅटमध्ये या हायड्रोपोनिक गांजाची लागवड करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभी केली होती. उत्पादन युनिटच्या डिझाइन आणि संचालनासाठी एआय आधारित साधनांचा वापरही केला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com