

AICTS Organizes Heart Health Awareness Campaign under 'Don't Miss a Beat' Initiative
Sakal
पुणे : जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधून पुण्यातील ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस’तर्फे (एआयसीटीएस) हृदयाच्या आरोग्याबाबत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘डोंट मिस अ बीट’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात हृदयविकारापासून बचाव आणि आपत्कालीन उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार या वेळी उपस्थित होते.