एअर इंडियाकडून 30 मेपासून पुणे-भोपाळसाठी नवी विमानसेवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

पुणे : एअर इंडियातर्फे पुणे-भोपाळ-पुणे अशी विमानसेवा 30 मेपासून सुरू होणार आहे. दिल्लीच्या विमानातूनही भोपाळला जाणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे भोपाळ-दिल्ली मार्गावरही आणखी एक विमानसेवा उपलब्ध झाली आहे. जेट एअरवेजची विमानसेवा बंद झाल्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य विमान कंपन्यांना नवे मार्ग खुल करून दिले आहेत. 

भोपाळसाठी विमानसेवा आठवड्यातील सहा दिवस उपलब्ध झाली आहे. हवाई दलाकडून सराव सुरू असल्यामुळे या मार्गावर फक्त शनिवारी विमानसेवा उपलब्ध नसेल. पुण्यावरून दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी हे विमान भोपाळसाठी रवाना होईल आणि दुपारी दोन वाजता तेथे पोचेल. तर भोपाळवरून सकाळी10 वाजून 45 मिनिटांनी ते सुटेल आणि दुपारी 12 वाजून पाच मिनिटांनी पुण्यात पोचेल. एअर इंडियाने दोन वर्षांपूर्वी पुणे-भोपाळ-रायपूर अशी विमानसेवा सुरू केली होती. परंतु, पुरेसे प्रवासी नसल्यामुळे कालांतराने ही सेवा बंद पडली.

जेट एअरवेजची विमानसेवा 17 एप्रिलपासून बंद झाल्यावर स्पाईस जेट, इंडिगो, एअर एशिया या विमान कंपन्यांनी अहमदाबाद, जयपूर, बंगळूर आणि दिल्लीसाठी जादा विमानसेवा सुरू केली आहे. गोएअरने दिल्लीसाठी नवी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India offers new air services to Pune-Bhopal from May 30

टॅग्स