कानांना आराम; मात्र "श्‍वास' गुदमरला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पुणे - फटाक्‍यांचा धूमधडाका आणि कानठळ्या बसविणारा आवाज या वर्षी तुलनेने कमी झाल्याचे जाणवले असले, तरीही वायू प्रदूषणात चांगलीच वाढ झाली. पाडव्याच्या दिवशी तर या प्रदूषणाने धोक्‍याची पातळी ओलांडल्याचे निदर्शनास आले आहे. 

फटाक्‍यांच्या विक्रीत दरवर्षीच्या तुलनेत यंदा 35 ते 40 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्‍यांना बगल देत नागरिक इतर फटाक्‍यांची खरेदी आवर्जून करत होते, असेही काही व्यापाऱ्यांनी सांगितले. 

फटाक्‍यांचा आवाज कमी झाला; परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वायु प्रदूषणात लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण "दिवाळीदरम्यानची हवेची गुणवत्ता' यासंदर्भातील अहवालात नोंदविले आहे. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) "सिस्टिम ऑफ एअर क्वॉलिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च' (सफर), अर्थ सिस्टिम सायन्स ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 
आठवड्यात शहरातील तापमानात चार अंश सेल्सिअसनी घट झाल्याचे निदर्शनास आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही तापमानात एक अंश सेल्सिअसने घट झाली होती. वाऱ्याचा वेगही प्रतितास एक ते दीड किलोमीटर इतका कमी होता. 

वायू प्रदूषणातील "पीएम 2.5' अर्थात 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाच्या सुक्ष्म कणीय प्रदूषणाची पातळी गेल्या वर्षी पाडव्याला 205 मायक्रोग्रॅम पर क्‍युबिक मीटर इतकी होती. हीच पातळी या वर्षी पाडव्याच्या दिवशी 337 मायक्रोग्रॅम पर क्‍युबिक मीटर इतकी झाली होती. ही पातळी "अत्यंत वाईट'. हवा आणि आरोग्यास धोक्‍याचा इशारा दर्शविते. हवेची गुणवत्ता खराब असल्यास हृदयविकार किंवा फुफ्फुसाचे आजार असणारे नागरिक, ज्येष्ठ किंवा लहान मुलांनी या हवेत थांबणे टाळावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. लक्ष्मीपूजनाला "पीएम 2.5'च्या प्रदूषणाची पातळी 192 इतकी होती. या पातळीची मध्यम स्वरूपात गणना करण्यात येते. पुढील दोन दिवसही हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाचीच राहील, असा अंदाजही संस्थेतील शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 

शहरात जाणवलेला थंडीचा हलकासा कडाका आणि संथगतीने वाहणारे वारे, यामुळे हवेतील कणीय प्रदूषण वाढण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. त्यात फटाक्‍यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडल्याने प्रदूषणाच्या पातळीने ऐन दिवाळीत धोक्‍याची सीमा ओलांडली. 
- गुरफान बेग, प्रकल्प संचालक, सफर 

*शहरातील वायू प्रदूषण : 
- सर्वाधिक प्रदूषणाची ठिकाणे : कात्रज, शिवाजीनगर, हडपसर, भूमकर चौक, निगडी, भोसरी, पाषाण, लोहगाव, आळंदी 
- सर्वांत कमी प्रदूषणाचे ठिकाण : मांजरी 

Web Title: air pollution Exceeded the danger level