esakal | पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली
sakal

बोलून बातमी शोधा

The air quality in Pune is better than other cities.

भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) 'सफर' या संकेतस्थळाच्या माध्यमातून पुणे, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या चार शहरातील हवेची गुणवत्ता नोंदली जाते. त्यानुसार दिल्ली शहरातील हवेची गुणवत्ता सर्वाधिक खराब तर पुण्याची स्थिती चांगली आहे. तसेच मुंबई आणि अहमदाबाद येथे मात्र हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले.

पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : पुण्यातील हवेची गुणवत्ता अन्य शहरांच्या तुलनेत चांगली आहे. शुक्रवारी शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक नोंदली गेली. दरम्यान, पुढील दोन दिवस हवेची गुणवत्ता याच श्रेणीत असेल असा अंदाज 'सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) मार्फत वर्तविण्यात आला आहे.

भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) 'सफर' या संकेतस्थळाच्या माध्यमातून पुणे, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या चार शहरातील हवेची गुणवत्ता नोंदली जाते. त्यानुसार दिल्ली शहरातील हवेची गुणवत्ता सर्वाधिक खराब तर पुण्याची स्थिती चांगली आहे. तसेच मुंबई आणि अहमदाबाद येथे मात्र हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा : रांजणगाव गणपती येथे नवीन बसचे स्वागत 

शहरातील हवेची गुणवत्ता दिवाळीतील काही काळामध्ये खराब श्रेणीची झाली होती. मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळही वाढली. त्यामुळे, वाहनांतील उत्सर्जनाचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या आठवड्यात थंडीमुळे शहरात वाऱ्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे प्रदूषणातील अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) आणि सूक्ष्म धूलिकण (पीएम 10) हे जमिनीलगत साठल्याने हवेची गुणवत्ता घसरली होती. मात्र, सध्या हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत पोचली असून पुढील काही दिवस ही स्थिती अशीच राहणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : पोस्टात एंजट म्हणून करण्याची संधी

पाषाणमध्ये पीएम 2.5 चे प्रमाण कमी

शहरातील विविध भागांच्या तुलनेत शुक्रवारी पाषाण येथे सर्वाधिक कमी 47 प्रतिघन मीटर पीएम 2.5 ची नोंद करण्यात आली. आळंदी येथे 145 प्रतिघन मीटर आणि कोथरूड परिसरात 101 प्रतिघन मीटर इतकी पीएम 2.5 ची नोंद झाली. तसेच लोहगाव, शिवाजीनगर, आळंदी आणि कोथरूड येथील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीची होती.

शहरात शुक्रवारी प्रदूषणाची नोंद (प्रमाण प्रतिघन मीटर)

ठिकाण          पीएम 2.5   पीएम 10

शिवाजीनगर        81             70
पाषाण                47              55
कोथरूड          101             85
हडपसर             70              75
लोहगाव             97              96
निगडी                73             71
भोसरी                97            100
आळंदी              145          112
भूमकर चौक        78            77

loading image
go to top