esakal | काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त

बोलून बातमी शोधा

Fuel

विमानासाठी वापरले जाणारे इंधन अतिशुद्ध स्वरूपातले केरोसीन तेलच असते. तसेच जैवइंधनापासून देखील आता विमानासाठी इंधन तयार केले जात आहे. त्याला ‘पांढरे पेट्रोल’ असे देखील म्हटले जाते.

काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्यावर चालणाऱ्या वाहनांचे मालक वैतागून गेले आहेत. वाहन परवडत नाही म्हणून त्यांचा वापर कमी करण्यावर अनेकांनी भर दिला आहे. मात्र या सर्वांत चकित करणारी बाब म्हणजे डिझेलपेक्षाही विमानाचे इंधन स्वस्त आहे.

शहरात मंगळवारी (ता.१६) डिझेल ८५.०४ रुपये प्रतिलिटर आहे. देशात काही ठिकाणी त्याची किंमत अगदी ९० रुपयांच्या घरात पोचली आहे. मात्र विमानाचे इंधन देशात ५५ ते ६० रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. विमानांना लागणा-या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहे. तर पेट्रोल आणि डिझेलवर लागू असलेला सेस तर बिलकूलच नाही. तसेच नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय बजेटमध्ये कृषी अधिभार सुद्धा फक्त पेट्रोल व डिझेलवरच लावला गेला आहे. त्यामुळे ट्रक किंवा डिझेलवर चालणा-या इतर कोणत्याही वाहनाच्या इंधनापेक्षा विमानाचे इंधन सुमारे ४० टक्क्यांनी स्वस्त म्हणजे ५५ ते ६० रुपये प्रतिलिटर आहे, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी दिली.

Elections 2021: कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; केंद्र सरकारची मोठी घोषणा

विमानात कोणते इंधन वापरले जाते?
विमानासाठी वापरले जाणारे इंधन अतिशुद्ध स्वरूपातले केरोसीन तेलच असते. तसेच जैवइंधनापासून देखील आता विमानासाठी इंधन तयार केले जात आहे. त्याला ‘पांढरे पेट्रोल’ असे देखील म्हटले जाते. त्यास ‘एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (एटीएफ) असे तांत्रिक नाव आहे. काही विशिष्ट प्रकारच्या विमानात पेट्रोलसदृश इंधने वापरली जातात.

विकासकामांचे कर सर्वसामान्य नागरिकांवर आणि वाहतूकदारांवरच का?
विमान हे माल हे प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जाते. तर डिझेलवर चालणा-या वाहनांचा वापर देखील त्यासाठीच केला जातो. त्यामुळे इंधन ट्रकसाठी असो वा विमानासाठी. त्याबाबत असलेले कराचे धोरण एकच असले पाहिले. विकासकामांसाठी कर देण्याचा भार पेट्रोल-डिझेल वापरणारे सर्वसामान्य नागरिक आणि वाहतूकदारांवरच का लावला जातो ? विमानाने प्रवास करणारे त्यांच्यापेक्षा गरीब आहेत का? असा सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.

IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास'

एटीएफची किंमत (प्रतिलिटर)
शहर - किंमत
दिल्ली- ५५.७३
कोलकत्ता- ६०.१६
मुंबई - ५३.८५
चेन्नई - ५६.८७
(या किमती देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी १६ फेब्रुवारीपासून लागू आहेत)

राज्य सरकारने लावलेला व्हॅट डिझेलपेक्षा विमानाच्या इंधनावर जास्त आहे. मात्र तरी देखील इंधदरांमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान डिझेलवरील कर व अधिभार विमानाच्या इंधनावर लागू असलेल्या करांच्या पातळीवर आणणे आवश्यक आहे. तसेच केल्यास डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि महागाईला आळा बसेल.
- विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ते

शनिवारवाड्याला नाव कसं मिळालं? पुण्याच्या ऐतिहासिक वास्तूविषयी सर्वकाही एका क्लिकवर!​

महत्त्वाचे - 

- देशात डिझेल ८३ ते ९० रुपये प्रतिलिटर
- विमानाचे इंधन मात्र ५५ ते ६० रुपये दराने उपलब्ध
- विमानांच्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी
- पेट्रोल-डिझेलवर लागू असलेला सेस एटीएफवर आकारलाच जात नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)