esakal | ती दुबई फिरुन आली अन् बोगस पासपोर्ट देणाऱ्याचं बिंग फुटलं
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Arrest_Passport

सूर्यकुमार याने बनावट आधारकार्ड आ्रणि पासपोर्ट कोठे तयार केले आहे, याचा तपास करायचा आहे.

ती दुबई फिरुन आली अन् बोगस पासपोर्ट देणाऱ्याचं बिंग फुटलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बनावट कागदपत्रांआधारे तरुणीचे आधारकार्ड तयार करून त्याआधारे तिला पासपोर्ट मिळवून देणाऱ्यास विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. सूर्यकुमार सुब्रम्हण्यम बलजी (वय 50, रा. कुरमन्न पालेम, राज्य आंध्रप्रदेश) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी 22 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली असून ती सध्या जामिनावर आहे.

मोठी बातमी : बायडेन यांच्या शपथविधीवेळी दंगलीचा कट; FBI ने दिला अलर्ट​

तीन डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 22 वर्षीय तरुणीने आरोपीच्या मदतीने दासरी स्वप्ना या नावाने बनावट आधारकार्ड तयार केले. आधारकार्ड तसेच बनावट कागदपत्रे तिने पासपोर्ट कार्यालयात सादर करत पासपोर्ट मिळविला. त्या आधारे तिने नोकरीसाठी दुबईचा व्हिसा मिळविला. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथून दुबईला गेली. तर, 3 डिसेंबर रोजी दुबईतून पुण्यात आली. त्यावेळी लोहगाव विमानतळावर तिला अटक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

धनंजय मुंडेंविरोधात अत्याचाराची तक्रार; मुंडेंचा सविस्तर खुलासा​

सूर्यकुमार याने बनावट आधारकार्ड आ्रणि पासपोर्ट कोठे तयार केले आहे, याचा तपास करायचा आहे. त्याचे कोणी साथीदार आहेत का? तसेच त्याने याप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास करायचा असल्याने त्याला पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करीत आरोपीस 15 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image