मोठी बातमी : बायडेन यांच्या शपथविधीवेळी दंगलीचा कट; FBI ने दिला अलर्ट

US_Biden_Trump
US_Biden_Trump

वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे असलेल्या कॅपिटॉलमध्ये बुधवारी हिंसाचार झाला. यामुळे सध्या अमेरिकेत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अजून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी किंवा त्याअगोदर ट्रम्प समर्थक ५० राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलन करण्याची शक्यता आहे, असा इशारा एफबीआय या संस्थेने दिला आहे.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांकडून पुन्हा एकदा हिंसक आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेसंबंधीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वॉशिंग्टन शहराच्या सुरक्षेसाठी १५ हजार सैनिकी तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. तसेच वॉशिंग्टनमध्ये येणाऱ्या पर्यटकांना २४ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. १६ ते २० जानेवारी दरम्यान हिंसाचार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मेमोचा तपशील वाचणाऱ्या दोन अधिकाऱ्यांद्वारे ही माहिती समोर आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधीला अमेरिका युनायडेट ही संकल्पना असणार आहे. ''आम्ही संपूर्ण देशभरात नजर ठेवून आहोत. वॉशिंग्टनमध्ये १० हजार तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. आमचे गार्ड स्थानिक सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणीवर भर देतील. जर स्थानिक प्रशासनाने आणखी सुरक्षेची मागणी केली, तर सैनिकांच्या तुकड्या वाढविण्यात येतील,'' अशी माहिती नॅशनल गार्ड ब्युरोचे प्रमुख आर्मी जनरल डॅनियल होकानसन यांनी दिली. 

मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्यात येणार आहे, अशी माहिती अेमरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पॅलोसी यांनी स्पष्ट केलं आहे. घटनात्मक अधिकारांचा वापर करून ट्रम्प यांना पदावरून हटविण्यासाठी पॅलोसी यांनी उपाध्यक्ष माइक पेन्स यांनाही आवाहन केलं आहे. 

२५व्या घटनादुरुस्तीमधील अधिकारांचा वापर करून ट्रम्प यांची हकालपट्टी करण्यासाठी माइक पेन्स यांना राजी करावं लागणार आहे, यासाठी मतदान घेण्यात येईल. किंवा महाभियोगाची कारवाई ट्रम्प यांच्यावर होऊ शकते. जर महाभियोगाची कारवाई करण्यात आली, तर महाभियोगाद्वारे पदावरून हकालपट्टी झालेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष म्हणून इतिहासात नोंदविले जातील. 

- जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com