Pune : सीओईपीची व्हीआयटीवर मात; इंजिनिअरिंग ‘टी-२०’ क्रिकेट, एआयएसएसएमएस अॅल्यूम्नीचा विजय

केनेडी रोड येथील एआयएसएसएमएसच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या व्हीआयटीला सात बाद ११९ धावा करता आल्या त्यांच्या सुपर्ण मोरे व शौनक परांजपेने डाव सावरला.
AISSMMS Alumni emerge victorious in Engineering 'T-20' Cricket match against COEP
AISSMMS Alumni emerge victorious in Engineering 'T-20' Cricket match against COEPSakal

Pune News : ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) आयओआयटी आयोजित इंजिनिअरिंग टी-२० क्रिकेट स्पर्धेत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने (सीओईपी) विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (व्हीआयटी) सात गडी राखून पराभव केला.

केनेडी रोड येथील एआयएसएसएमएसच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या व्हीआयटीला सात बाद ११९ धावा करता आल्या त्यांच्या सुपर्ण मोरे व शौनक परांजपेने डाव सावरला.

सोहम कुमठेकर, हर्षवर्धन पितळे व मल्हार पिंपरकरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. सीओईपी संघाने ७.३५ च्या सरासरीने तीन बाद १२० धावा करून विजय मिळविला यावेळी विजयसिंह राजपूत, मल्हार पिंपरकर व सोहम कुमठेकरने केलेली खेळी उपयुक्त ठरली. सिद्धांत पैकेकरने दोन गडी बाद केले.

अभिजित बेदारेची चमकदार खेळी आणि अटल देशमुखच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एआयएसएसएमएस अॅल्यूम्नीने मॉडर्न वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा (एमईएसडब्लू सीओई) बारा धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या एआयएसएसएमएस अॅल्यूम्नीने ८.१० च्या सरासरीने ८ बाद १६२ धावा केल्या यावेळी अभिजित बेदारेने २२ चेंडूत दोन चौकार व तीन षटकारासह ४० धावांची खेळी केली त्याला सागर मलपत्ती, अरबाझ नदाफने सुरेख साथ दिली.

अभिजित बेदारेने सागर मलपत्तीच्या साथीत चौथ्या विकेटकरिता ६६ धावांची भागीदारी केली. सागर भटने चार गडी बाद केले. प्रत्यूत्तर देताना एमईएसडब्लू सीओईला ७.५० च्या सरासरीने ८ बाद १५० धावा करता आल्या यावेळी त्यांच्या रोहन गायकवाडने चार चौकार व दोन षटकारासह केलेली ४४ धावांची खेळी अपुरी ठरली.

रोहन गायकवाडने अथर्व गोडसेच्या साथीत चौथ्या विकेटकरिता ५२ धावांची भागीदारी केली. अटल देशमुखने तीन तर अभिजित बेदारेने दोन गडी बाद केले. या स्पर्धेतील ‘सामन्याचा मानकरी’ हा मान विजयसिंह राजपूत आणि अभिजित बेदारेने पटकाविला.

धावफलक

१) विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) - ७ बाद ११९ (सुपर्ण मोरे २४, शौनक परांजपे २३, सोहम कुमठेकर २-१४, मल्हार पिंपरकर २-२४, हर्षवर्धन पितळे २-२७) पराभूत विरुद्ध कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) - ३ बाद १२० (विजयसिंह राजपूत ३०, मल्हार पिंपरकर २९, सोहम कुमठेकर २८, सिद्धांत पैकेकर २-१८, गौरंग वानखेडे १-२८)

२) एआयएसएसएमएस अॅल्यूम्नी - ८ बाद १६२ (अभिजित बेदारे ४०, सागर मलपत्ती ३१, अरबाझ नदाफ २८, सागर भट ४-३१, हर्षवर्धन गलांडे १-२७, हर्षवर्धन पाटील १-३६, अभिजित जाधव १-४५) विजयी विरुद्ध मॉडर्न वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग - (एमईएसडब्लू सीओई) - ८ बाद १५० (रोहन गायकवाड ४४, अभिषेक मुसळे २८, अटल देशमुख ३-२८, अभिजित बेदारे २-२०, प्रवीण इंगळे १-२७, सागर मेलापत्ती १-३०)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com