esakal | 'एआयएसएसएमएस' मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा
sakal

बोलून बातमी शोधा

pune

'एआयएसएसएमएस' मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: शहरातील ‘एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’(Aissms institute of information technology) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध अत्याधुनिक प्रयोगशाळांचे(Laboratories) उद्‍घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

या प्रयोगशाळांमध्ये मीरा तगारे यांनी दिलेल्या भरघोस देणगीतून अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘पॉवर क्वालिटी एक्सपेरियन्स सेन्टर’ची निर्मिती करण्यात आली आहे, तर महाविद्यालयाच्या ‘इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंडिविजुअल कनेक्ट’ या उपक्रमाअंतर्गत ‘इमर्सन एक्स्पोर्ट इंजिनिअरिंग सेंटर’, फोर्ब्स मार्शल यांनी दिलेल्या देणगीतून अनुक्रमे ‘इमर्सन सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि ‘फोर्ब्स मार्शल सेंटर ऑफ एक्सलन्स’ या दोन अत्याधुनिक प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळांचा उपयोग विद्यार्थी, उद्योग क्षेत्रांतील नवोदित आणि इलेक्ट्रिकल युटिलिटी इंजिनिअर्स यांच्या प्रशिक्षणासाठी करण्यात येईल.

हेही वाचा: गौरी-गणपती सणानिमित्त कोकणात जादा गाड्या

या प्रसंगी सामंत यांनी अत्याधुनिक प्रयोगशाळांची तंत्रशिक्षणात असलेली गरज अधोरेखित केली, तसेच या उपक्रमासाठी महाविद्यालयाची प्रशंसा केली. संस्थेचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी कुशल अभियांत्रिकी मनुष्यबळ निर्माण करण्यात अत्याधुनिक प्रयोगशाळांचे योगदान, याविषयी भाष्य केले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांनी कौशल्य आणि ज्ञानासह बहुआयामी विकास साधणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नवीनतम विकास आणि तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे या महाविद्यालयाच्या ध्येयावर प्रकाश टाकला.

या वेळी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने, फोर्ब्स मार्शलचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर धामणकर, फोर्ब्स मार्शलचे प्रकल्प व्यवस्थापक शरद राहुडकर, ‘एआयएसएसएमएस’चे मानद सहसचिव सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मौसमी वंजाळे यांनी केले. तर प्रा. सचिन शेलार यांनी आभार मानले.

loading image
go to top