Positive Story : मी आत्महत्याच करणार होतो, पण तेवढ्यात... (व्हिडिओ)

 Ajit Kumar recovered from paralysis on the strength of exercise In just 95 days
Ajit Kumar recovered from paralysis on the strength of exercise In just 95 days

पुणे : पॅरॅलिसीसच्या अटॅकनंतर मी तीन दिवसांपासून रुग्णालयात होतो. त्यावेळी अर्ध्या शरीराची हालचालच बंद होती. अशा काळात वैयक्तिक गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे मला असह्य झाले. मनात आत्महत्तेचा विचार आला. मी नर्सच्या नकळत ब्लेडचा एक तुकडाही जवळ ठेवला होता. रात्री सगळे झोपल्यावर जीवनाचा प्रवास संपवायची हे पक्के केले. पण, दुपारी कूस बदलण्यासाठी मी जोराने शरीराला धक्का दिला आणि तेवढ्यात माझ्या डाव्या हाताचे मधले बोट काहीसे हलले. बस मनाशी पक्क ठरवलं. आता संपूर्ण शरीराचीच हालचाल करुन दाखवायची आणि त्या दिवसापासून व्यायामाला लागलो.

वयाच्या पन्नाशीत असलेले अजितकुमार प्रसाद अर्धांगवायूतून सावरल्यावर "सकाळ'शी संवाद साधत होते. कोरोनाच्या काळात आलेले आजारपण हे असहायतेची तीव्रता लाख्खो पटींनी वाढवते. आजवरचं संपूर्ण आयुष्यच स्वावलंबी पणे जगणाऱ्या प्रसाद यांना हा अनुभव जीवघेणाच वाटला. यातून सुटका फक्त मृत्यूच्याच दारात होऊ शकते या भावनेने त्यांनी आत्महत्तेचा विचार पक्का केला. पण बोटांच्या छोट्याश्‍या हालचालीने मिळालेला दुर्दम्य आशावाद आणि खडतर व्यायामानंतर त्यांनी केवळ 95 दिवसांत 95 टक्के शरीर पूर्ववत केले आहे.

दुखःद ! मुलाचा रांजणखळग्यात बुडून मृत्यू, वडिलांचे हृदयविकाराने निधन​
 

प्रसाद सांगतात,"जुलै महिन्याच्या 25 तारखेच्या रात्री लघवीसाठी झोपेतून उठत होतो. तर अर्धे शरीर जागेवरून हाललेलेच नाही! क्षणभर वाटलं हा भास असेल. पण नकळतपणे डावा खांदा तपासणाऱ्या उजव्या हाताने मला भानावर आणले. माझ्या क्षणार्धात लक्षात आले हा पॅरॅलिसीसचा (अर्धांगवायू) अटॅक आहे. मी जोराने ओरडून घरच्यांना कल्पना दिली. शेजारी असलेल्या अक्‍यूपंक्‍चरच्या मशिनने मी चेहऱ्याला अर्धांगवायूचा झटका बसण्यापासून वाचवले.'' 

प्रसाद पूर्वीपासून अर्धांगवायू झालेल्या लोकांवर मालिश आणि उपचार करत होते. ते ज्ञान त्यांच्या आता उपयोगाला आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सुरवातीचे तीन दिवस त्यांच्यासाठी मानसिक दृष्ट्या आव्हानात्मक होते. पण रोज व्यायाम आणि मालिश करून त्यांनी अर्धांगवायूवर विजय मिळवला आहे. आज ते अगदी सहजपणे मॉर्निंग वॉकला तर जातात पण त्याचबरोबर सर्व प्रकारचा व्यायामही सहजपणे करतात. 

बाळासाहेबांच्या वेळी राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत पण आता पुण्यात : संजय राऊत

''हॉस्पिटलमध्ये मोबाईलच्या माध्यमातून मी माझी हालचाल टिपली. ते व्हिडिओ पाहून कोणता व्यायाम करायला पाहिजे याचा अंदाज बांधला. सुरवातीला इतरांच्या साहाय्याने नंतर माझे मीच रोज व्यायाम करायचो. आज त्यामुळेच माझा पुनर्जन्म झाला.''
- अजितकुमार प्रसाद, बोपोडी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com