'पदवीधर'साठी भाजपचे महानोंदणी अभियान; अडीच हजार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

गेल्या आठ महिन्यात पक्षाच्या वतीने व्हर्च्युअल सभा आणि बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि ऑनलाइन माध्यमातून सुमारे 40 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे.

पुणे : शहर भाजपच्यावतीने येत्या रविवार (दि.1) रोजी संपूर्ण शहरात 'पदवीधर मतदार नोंदणी' महाअभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे एकाच दिवशी पक्षाचे अडीच हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरून 25 हजार मतदारांची नोंदणी करणार आहेत, असे पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र नोंदणी प्रमुख राजेश पांडे यांनी शुक्रवारी (ता.30) पत्रकार परिषदेत सांगितले. 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन​

गेल्या आठ महिन्यात पक्षाच्या वतीने व्हर्च्युअल सभा आणि बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि ऑनलाइन माध्यमातून सुमारे 40 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे. याच मोहिमेचा पुढील भाग म्हणजे हे महाअभियान पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे, असेही पांडे यांनी सांगितले. यावेळी पुणे नोंदणी प्रमुख डॉ. श्रीपाद ढेकणे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, राजेश येनपुरे, दीपक पोटे आणि दत्ता खाडे उपस्थित होते. 

फॅमिली कोर्टमधील तत्काळ दाव्यांच्या सुनावणीला मिळणार गती; इतर प्रकरणांना 'तारीख पे तारीख'!​

पांडे म्हणाले, "या महाअभियानांतर्गत बूथ स्तरावर सोसायट्या, चाळी, वस्ती अशा पाचशे ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून मतदार नोंदणी बूथ लावण्यात येणार आहेत. पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधीपासून ते बूथ समितीचे सदस्य घरोघरी जाऊन मतदारांना नोंदणीचे आवाहन करणार आहेत. बूथवर ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी www.bjppunepadvidhar.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.'' 

पुण्यात घडली किळसवाणी घटना; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार​

या निवडणुकीसाठी आयोगाकडून मतदान केंद्र निश्‍चित करताना भौगोलिक परिस्थितीचा विचार करण्यात आलेला नाही. 16 किलोमीटर अंतरावर एक मतदान केंद्र असणार आहे. हे अंतर कमी करून पाच किलोमीटर करावे. तसेच मतदार नोंदणीचे अर्ज पेंडिंग राहण्याचे प्रमाण अधिक आहे. ते तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांच्याकडे पक्षाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती ढेकणे यांनी यावेळी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP mass registration campaign for graduate voter registration