

Ajit Pawar Makes Explosive Claim On Irrigation Scam
Esakal
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपने ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. हे आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडीभर पुरावे असल्याचंही म्हटलं होतं. भाजपने अनेकदा अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यावरून घेरलंय. दरम्यान, आता महापालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यावरून खळबळजनक दावा केलाय. राज्यात १९९९ ला राष्ट्रवादीची सत्ता आली पण त्याआधीच्या सरकारनेच सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली असा आऱोप अजित पवार यांनी केला आहे.