esakal | अजित पवारांनी विचारलं झाडाचं नाव; वन अधिकाऱ्यांची बोलती बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit pawar

अजित पवारांनी विचारलं झाडाचं नाव; वन अधिकाऱ्यांची बोलती बंद

sakal_logo
By
शीतल बर्गे -----------------, प्रयागा होगे --------------------

घोरपडी - वानवडीमध्ये वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या हस्ते आज पार पडले. नुतनीकरण केलेल्या कार्यालयाची अजित पवार (Ajit pawar) यांनी पाहणी करून माहिती घेतली. तसेच, यावेळी अजित पवार (Ajit pawar) यांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. (Ajit Pawar asked the name of the tree Forest officer keep quite)

हेही वाचा: जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलेल्या 'त्या' व्हिडिओवर दोन मतप्रवाह

यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी सांगितले की, वनविभागामध्ये जास्तीत जास्त आयुर्वेदिक देशी झाडांची लागवड व्हायला हवी. याच बरोबर झाडांचे काळजीपूर्वक जतन होणे गरजेचे आहे.

वन अधिकाऱ्यांना झाडे नाव सांगता येईना !

उपमुख्यमंञी अजित पवारांचे (Ajit pawar) आगमन होताच वन अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून वृक्षारोपण करण्याची विनंती केली. वृक्षारोपण करण्यासाठी जात असताना पवारांनी अचानक एका झाडाकडे इशारा करत त्याचे नाव विचारले, बराच वेळ कुणालाच उत्तर देता आले नाही. तेवढ्यात एका अधिकाऱ्याने झाडाच्या नावांचा उल्लेख करत वेळ मारुन नेली. माञ, वन अधिकाऱ्यांनाच झाडाचे नाव सांगता येईना म्हणून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली

हेही वाचा: देशमुख, परब यांच्यापाठोपाठ सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात?

बाणेरच्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

तसेच, बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची (Covid 19 Hospital) उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी आज भेट देऊन तेथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेत, वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी रुग्णालयातील एकूण क्षमता, आयसीयूमध्ये (Icu) असलेल्या सोई सुविधा आदी तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, बाणेर बालेवाडीतील पाणी प्रश्नाबाबत आढावाही त्यांनी घेतला.

हॉस्पिटलची ठळक वैशिष्ट्ये

  • एकूण बेड क्षमता- 209

  • ऑक्सिजन बेड- 147

  • आयसीयु बेड- 62

  • ऑक्सिजनसाठी दोन प्रकल्पाची उभारणी

loading image