Ajit Pawar : फुले वाड्यातील स्मारकाला मोठी जागा देण्याची अजित पवारांचे आश्वासन

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ आम्ही सगळ्यांनी मिळून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्याचे ठरविलेले आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
Updated on

Pune News : ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ आम्ही सगळ्यांनी मिळून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्याचे ठरविलेले आहे. मुळातच स्मारक झालेले आहे, परंतु जागा फार कमी पडत आहे.

म्हणूनच आजूबाजूची मोठ्या प्रमाणात जागा घेऊन आणि ज्यांची जागा घेतली जाणार आहे, त्यांचे समाधान होईल असा मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा आमचा प्रयत्न आहे,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पवार यांनी महात्मा फुले वाड्यात हजेरी लावून अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींच्या सुरू केलेल्या पहिल्या शाळेची जागा ताब्यात घेतली आहे. ही जागा महापालिकेच्या ताब्यात दिली आहे.

त्याचे पाच-सहा नियोजन आराखडे तयार झाले आहेत. सर्वाधिक लोकांची मान्यता मिळेल, तो नियोजन आराखडा मान्य होईल आणि त्यानंतर तेथे काम सुरू होईल.’’ या कामातही कोणत्याही प्रकारच्या निधीची अडचण भासणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.

सातारा, नाशिक, कोकण येथील जागा वापटपाबद्दल लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि आम्ही चर्चा करून योग्य मार्ग काढू, असेही पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याने महायुतीला नक्कीच फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वदूर भाजप पोचविणाऱ्या खडसेंची घरवापसी : अजित पवार

‘‘गेल्या ४० वर्षात राज्यात भारतीय जनता पक्ष वाढविण्याचे काम ज्यांनी केले, त्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथराव खडसे, नितीन गडकरी यांचे नाव घेता येईल. परंतु उत्तर महाराष्ट्रात भाजप सर्वदूरपर्यंत पोहोचविण्याचे काम खडसे यांनी केले आहे. मी राजकारणात आल्यापासून तिथे खडसे यांचे प्रभुत्व होते. परंतु काही कारणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते, आता त्यांनी घरवापसी केली आहे.’’

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com