अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन

मिलिंद संगई
Saturday, 25 January 2020

एक व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय होता. तेर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. शेती हा त्यांच्या आवडीचा विषय होता.

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे धाकटे बंधू अमरसिंह बाजीराव पाटील (वय 50) यांचे प्रदीर्घ आजाराने आज (शनिवार) पहाटे पुण्यात निधन झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय होता. तेर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. शेती हा त्यांच्या आवडीचा विषय होता. काही काळ त्यांनी शेतीपुरक व्यवसाय देखील केला होता. त्यांचे वाचन दांडगे होते, एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

कोरेगाव-भीमाप्रकरणी केंद्राचा तडकाफडकी निर्णय; तपास ‘एनआयए’कडे

आज दुपारी त्यांच्या मूळ गावी तेर (जि. उस्मानाबाद) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar brother-in-law Amar Singh Patil passed away