esakal | स्मार्ट सिटीचे अजित पवारांनी काढले वाभाडे!
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit-Pawar

कोट्यवधी रुपये देऊन कन्सल्टंट नेमता अन्‌ काय टाइल्स लावता ! कलर कॉम्बिनेशन म्हणजे काय कळतं का, काय इमारती बांधता, यापेक्षा गावातील कामे बरी... अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सल्लागार समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या कामाचे वाभाडे काढले, तर खासदार गिरीश बापट यांनीही ‘कन्सल्टंटवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहात, तुम्हाला काय ताजमहाल बांधायचे आहेत का,’ अशा शब्दांत स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजावर ताशेरे ओढले.

स्मार्ट सिटीचे अजित पवारांनी काढले वाभाडे!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोट्यवधी रुपये देऊन कन्सल्टंट नेमता अन्‌ काय टाइल्स लावता ! कलर कॉम्बिनेशन म्हणजे काय कळतं का, काय इमारती बांधता, यापेक्षा गावातील कामे बरी... अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सल्लागार समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या कामाचे वाभाडे काढले, तर खासदार गिरीश बापट यांनीही ‘कन्सल्टंटवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहात, तुम्हाला काय ताजमहाल बांधायचे आहेत का,’ अशा शब्दांत स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजावर ताशेरे ओढले. स्मार्ट सिटीच्या कामांच्या चौकशीचा अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश पवार यांनी या वेळी दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी बापट, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे आदी उपस्थित होते. बांधकाम व्यावसायिक सतीश मगर आणि अनिरुद्ध देशपांडे विशेष निमंत्रित होते. बैठकीला प्रारंभ झाल्यावर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी सादरीकरण केले. त्या वेळी पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली. त्यावर स्मार्ट सिटीला आत्तापर्यंत सुमारे ६०० कोटी रुपये मिळाले असून, ४२१ कोटी रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मिसाळ, तुपे, टिंगरे यांनी झालेल्या खर्चाचे नेमके तपशील मागितले; परंतु स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी खर्चाचे आकडे सांगण्यास सुरवात केली. त्यावर उपस्थित आमदार चिडले. कन्सल्टंटवर स्मार्ट सिटीने सुमारे ३० कोटी रुपये खर्च केल्याचे प्रशासनाने सांगितले. तेव्हा मॅकेंजी या कन्सल्ल्टंटला सर्वाधिक निधी मिळाला असून, त्यांनाच काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे तुपे यांनी निदर्शनास आणले. 

मारटकर खून प्रकरण : वेश्‍यावस्तीत वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठीच खून

महत्त्वाचे निर्णय

  • स्मार्ट सिटीच्या सर्व कामांच्या चौकशीचा अहवाल सादर होणार
  • स्मार्ट सिटीने केलेल्या कामांचे ‘सीओईपी’कडून ऑडिट होणार 
  • पूर्ण झालेल्या, सुरू असलेल्या कामांचा सद्यःस्थितीत अहवाल पुढच्या बैठकीत मांडणार

...तर तुम्ही राजीनामा द्याल का? 
स्मार्ट सिटीच्या कामावर बापट टीका करत होते. तेव्हा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बापट यांना, तुमची माहिती तपासून पाहा, तसे काही झालेले नाही, असे सांगितले. त्यावर बापट म्हणाले, ‘मी केलेल्या आरोपांचे माझ्याकडे पुरावे आहेत. ते तुम्हालाही देतो. त्यात काही खोटे असेल, तर खासदारकीचा राजीनामा देतो. बरोबर असेल तर तुम्ही विभागीय आयुक्तपदाचा राजीनामा देणार का?’

लहान मुलांची भांडणं सोडवणं तरुणाला पडलं महागात; तिघांनी केले कोयत्याने वार

कन्सल्टंटवर कोट्यवधींचा चुराडा
प्रशासनाने दिलेल्या माहितीवर चिडलेले खासदार बापट म्हणाले, ‘स्मार्ट सिटीने ४० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ३०० कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजे एका किलोमीटरला ७ ते ८ कोटी रुपये खर्च येतो का? कन्सल्टंट सबकन्सल्टंट नेमतात, त्यांच्यावरही कोट्यवधी रुपये खर्च करतात, त्यापेक्षा महापालिकेतील अधिकाऱ्यांचा सल्ला का घेतला जात नाही?’

Edited By - Prashant Patil