सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक : अजित पवार 

सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक : अजित पवार 

पुणे : राज्यकर्त्यांकडून सध्या बनवाबनवी सुरू असून, सरकारच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये फरक आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. येत्या सहा महिन्यांत निवडणुका लागणार आहेत. अंगणवाडी सेविकांनी मनात आणले, तर पुढील वर्षी आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अल्पबचत भवनात गुरुवारी आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना 2017-18 जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले; तसेच "बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाअंतर्गत मुला-मुलींचा जन्मदर मोजण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात येणाऱ्या "गुड्डा-गुड्डी' फलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. 

"पंतप्रधानांनी स्वत:ला प्रधानसेवक आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्य सेवक म्हणून घ्यायला सुरवात केली; पण त्यांच्या वागण्यात सेवकाचा भाव दिसून येत नाही. याउलट अधिकारासाठी आवाज उठविणाऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे,' अशी टीका पवार यांनी केली. अंगणवाडी सेविकांकडून लहान मुलांचे भवितव्य घडविण्याचे काम केले जाते. त्यांना सरकारने पुरेशा सुविधा देणे अपेक्षित आहे, असे त्यांनी नमूद केले. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती राणी शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे आदी या वेळी उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com