मलिदा खाणाऱ्याची चौकशी करा : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

बारामती शहर : नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पगारातील पैशांचा मलिदा नेमका कोण खातो आहे, याची चौकशी मुख्याधिकाऱ्यांनी करावी, अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमादरम्यान बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी पवार यांनी हे स्पष्ट निर्देश दिले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव, आरोग्य समितीच्या सभापती तरन्नूम सय्यद यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी आणि नगरसेवक या प्रसंगी उपस्थित होते. 

वर्षभर सफाई कर्मचारी बारामतीकरांची सेवा करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरन्नूम सय्यद यांच्या पुढाकारातून यंदा सर्व कर्मचाऱ्यांना अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कोणीतरी पवार यांना चिठ्ठी देत, कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नाही. त्यांच्या वेतनातील पैसे काढून घेतले जातात, अशी तक्रार केली.

अजित पवार यांनी याची गांभीर्याने दखल घेत, याची तातडीने चौकशी करून कोण यातील मलिदा खातो, याची माहिती आपल्याला द्यावी, अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांना केल्या. 

बारामती शहर स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी जे योगदान देत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक करून सर्वांनीच बारामती स्वच्छ व सुंदर राहावी यासाठी आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन पवार यांनी केले.

Web Title: Ajit Pawar demands inquiry in Health departments financial irregularities