मंचर - आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील साकारमाच (आहुपे) गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव येत्या आठ दिवसांत आवश्यक माहितींसह केंद्र सरकारकडे सादर करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला दिले. त्यामुळे गेली अनेक वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.