Ajit Pawar: महाराष्ट्रातील चार लाख तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी मिळणार; उपमुख्यमंत्र्यांचे विधान

Latest Marathi News: प्राप्त स्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान घेवून यापुढे जगात कोठेही जाण्याची तयारी ठेवावी
Ajit Pawar Likely To Form Third Front In Maharashtra
Ajit Pawar Likely To Form Third Front In MaharashtraEsakal
Updated on

Malegao : जपान,फान्स, जर्मनी आदी युरोप देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची खूपच टंचाई आहे. त्या तुलनेत भारत देशामध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. त्याच हेतूने महाराष्ट्र सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला.

या प्रक्रियातून राज्यातील सुमारे चार लाख तरूणांना पुरेशा वेतनावर (महिना दोन लाख) रोजगाराची नामी संधी मिळणार आहे. याशिवाय राज्यात नव्याने अनेक औद्योगिक प्रकल्प उदयास येणार आहेत. या प्राप्त स्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान घेवून यापुढे जगात कोठेही जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात केले.

माळेगाव (ता.बारामती) येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय़टीआय) भारत फोर्ज कंपनीच्या सीएसआर फंडातून डिजिटल सीएनसी सिम्युलेशन लॅब उभारण्यात आली आहे.

या लॅबच्या उद्घाटन प्रसंगी आज अजित पवार बोलत होते. यावेळी भारत फोर्ज सीएसआर प्रमुख डाॅ. लिना देशपांडे, सहसंचालक रमाकांत भावसार, जिल्हा व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यु.के.सुर्य़वंशी, माळेगाव आय़टीआयचे सदाशिव पाटील, सचिन धुमाळ, संजय आग्रवाल, सुनिल चोरे, सचिन सातव, दीपक तावरे , सुनील पवार, दत्तात्रेय येळे, रणजीत तावरे, तानाजी देवकाते, रविराज तावरे, अनिल तावरे , धनंजय जामदार, जयदीप तावरे आदी उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार म्हणाले,`` महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य असून या राज्याच्या सर्वांगीण विकासात उद्योग विभागाचे मोठे योगदान आहे

. राज्याची उद्यमशील प्रतिमा संवर्धनासाठी, प्रगतीशील व पुरोगामी ध्येयांची आखणी व अंमलबजावणी करणे, नवनवीन उद्योगांच्या उभारणीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, स्वदेशी तसेच परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवून सातत्यपूर्ण विकास साधणे, त्याद्वारे रोजगार निर्मिती त्याचप्रमाणे मानवी संसाधने आणि पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी करणे हे महायुती सरकारची ध्येय-धोरण आहेत.

Ajit Pawar Likely To Form Third Front In Maharashtra
अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

औद्योगिक क्षेत्रांचा विकास करण्यासाठी कुशल मनुष्यबळ खुप महत्वाचे आहे. त्याकामी शासनस्तरावर होणाऱ्या प्रयत्नाला मदत भारत फोर्ज, टाटा, बजाज सारख्या अनेक नामांकित कंपन्या योगदान देतात याचे समाधान वाटते, असे मत पवार यांनी व्यक्त केले. माळेगाव आयटीआय संस्थेच्या स्थापनेसाठी जागा उपलब्ध करून देणारे माजी सरपंच कै. भुजंगराव तावरे यांचेही पवार यांनी आवुर्जन कौतूक केले.

डाॅ. देशपांडे यांनी भारत फोर्जच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयांचा सीएसआऱ फंड हा मनोभावे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापर असल्याचे सांगितले. या कंपनीने बारामती-माळेगाव, भोर, कर्जत या ठिकाणच्या आय़टीआय संस्थांमध्ये डिजिटल सीएनसी सिम्युलेशन लॅब उभारल्याचे सांगितले. यापुढील काळात इंदापूर तालुक्यात कंपनीचे योगदान दिसून येईल, असे देशपांडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल धुमाळ यांनी केले.

Ajit Pawar Likely To Form Third Front In Maharashtra
Ajit Pawar: कार्यक्रमात 'एकच वादा अजितदादा'ची घोषणा, पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये घेतली कार्यकर्त्यांची फिरकी

बाबा कल्याणी यांचे अभिनंदन...

भारतामध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडाद्वारे शिक्षण, आरोग्य, पर्य़ावरण रक्षण अशा अनेक क्षेत्रातील उपक्रम पुर्णत्वाला आणले आहेत. त्यानुसार भारत फोर्ज कंपनीन सामाजिक, शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले आहे. त्यामुळे कल्याणी ग्रुफबरोबर बाबा कल्याणी यांचे मनस्वी अभिनंदन करतो, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

Ajit Pawar Likely To Form Third Front In Maharashtra
Ajit Pawar गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवारांसोबत एकाच स्टेजवर, चर्चांना उधाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com