Ajit Pawar in Pune rally
Ajit Pawar in Pune rally

Ajit Pawar in Pune: 'कुणाचे फोन आले तरी हळवे होऊ नका'; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Ajit Pawar in Pune Swarajya rally : नव्या विचाराने आपण पुढे जात आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. ते पुण्यामध्ये 'स्वराज्य सभे'मध्ये बोलत होते.

पुणे- कुणाचे फोन आले तरी हळवं बनू नका. त्यातून तुमच्या मनामध्ये चलबिचल आणू नका. आम्ही जर रोज फोन करायला लागतो तर तेवढं एकच काम करावं लागेल. पण, विकासाचं काम करुन देऊ. कोणताही प्रश्न आणला तर ते काम पूर्ण करुन देऊ. नव्या विचाराने आपण पुढे जात आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. ते पुण्यामध्ये 'स्वराज्य सभे'मध्ये बोलत होते. (Ajit Pawar in Pune Swarajya rally appeal to workers)

पंतप्रधान मोदींनी ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य दिलं आहे. येत्या काळात २ कोटी घरे बांधण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. जे झालं ते मान्य केलंच पाहिजे. त्यांच्या व्हिजनचा फायदा राज्याला करुन घ्यायचा आहे. आपली फरफट होऊ नये यासाठी आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागला. सध्या पंतप्रधान मोदींना कोणीही पर्याय नाही. आपल्याला तिसऱ्यांदा मोदींना निवडणून द्यायचं आहे, असं पवार म्हणाले.

Ajit Pawar in Pune rally
बहुजन समाजातील माणसाचं भलं करण्यासाठी राजकारण करणारी आम्ही मंडळी आहोत - अजित पवार

मुख्यमंत्री-मुख्यमंत्री घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी सल्ला दिला आहे. जरा कळ सोसा, नुसतं मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करु नका. पक्ष सघटना मजबूत करण्याकडे आधी लक्ष द्या, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत. आपण विचारधारा सोडलेली नाही. धर्मनिरपेक्षता ही आपली विचारधारा आहे. फक्त काळानुसार आपल्याला बदलावं लागतं. राष्ट्रवादीनं कायम वंचिताचा विचार केला आहे, असं ते म्हणाले.

नव्या विचारांनी आपण पुढे चाललो आहोत. माझं कायम तरुणांच्या प्रश्नांवर लक्ष असतं. युवकांना बळ देणं महत्वाचं आहे. क्रिडा क्षेत्राला अधिक प्रोत्याहन देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात आहे. निवडणुका समोर ठेवून काही घोषणा करायचं हे मला जमत नाही. राष्ट्रवादीकडे क्रीडा खातं आलं तेव्हा ऑलिम्पिक भवनाला निधी दिला, अशी माहिती पवारांनी दिली.

Ajit Pawar in Pune rally
Ajit Pawar: सिद्दीकींच्या पाठोपाठ आणखी नेते करणार राष्ट्रवादी प्रवेश? अजित पवारांनी केलं स्पष्ट

शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. शिवरायांचा धगधगता इतिहास जागा करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या काळात महाराजांचा इतिहास कळावा, त्यांचं धैर्य, शौर्य याची माहिती मिळावी यासाठी कार्यक्रम आखले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com