Jitendra Awhad : अजित पवार स्वार्थापोटी पंचक्वानावरून पत्रावळीवर बसले, याची इतिहासात कायम नोंद होईल

'केवळ इर्षा व स्वार्थापोटी अजित पवार हे पंचक्वानाच्या ताटावरून पत्रावळीवर जाऊन बसले, आता मला कोणी वाढतंय का? अशी वाट त्यांना पहावी लागत आहे.
 Ajit Pawar and Jitendra Awhad
Ajit Pawar and Jitendra Awhad sakal

पुणे - 'केवळ इर्षा व स्वार्थापोटी अजित पवार हे पंचक्वानाच्या ताटावरून पत्रावळीवर जाऊन बसले, आता मला कोणी वाढतंय का? अशी वाट त्यांना पहावी लागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा अजित दादांचे हे उदाहरण कायम लिहिले जाईल" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर सोमवारी निशाणा साधला.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी निश्चितीसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात सोमवारी महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी आव्हाड आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आव्हाड म्हणाले, 'सुप्रिया सुळे या अजित पवार यांना कायम दादा, दादा करायच्या तेव्हा, मला राग यायचा. कारण दादांना सुळे यांचे प्रेम, घर तुटू नये, पक्ष तुटू नये अशी त्यांची भावना कधी समजली नाही. प्रेम व हृदय यांचा दादांशी कधी संबंधच आला नाही."

अर्चना पाटील यांच्या"माझे पती भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादी पक्ष का वाढवू" या वक्तव्याबाबत आव्हाड म्हणाले, "अर्चना पाटील सत्य बोलल्या. आम्ही ही तेच सांगत आहोत. रायगड व बारामती या दोन जागा सोडल्या, तर अजित पवार यांनी पक्ष फोडून मिळवले तरी काय ? ३५ वर्ष राजकारणात मेहनत घेणारे आज पक्षात धडपड करत आहेत. स्व:ताच्या स्वार्थासाठी अजित पवार यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे वाटोळे करण्याचे काम केले.

वसंत मोरेंचे संविधानासाठी योगदान काय?

वंचित आघाडीची उमेदवारी मिळालेल्या वसंत मोरे यांचे आंबेडकरी चळवळ, संविधानासाठी काय योगदान आहे. मोरे यांनी कोणते आंदोलन केले ? कोणत्या दलितांच्या मदतीला गेले ? केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची मते खायची आणि मुरलीधर मोहोळ यांची मते वाढवायची इतकेच काम ते करणार आहेत. पण मुस्लिम, दलित यांना आता संविधान कोण वाचवणार आहे आणि कोणाला मते द्यायची हे चांगले कळले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

पोलिस आयुक्तांना लाज कशी वाटत नाही

जातीपाती वरुन पुण्यात मारामाऱ्या होतात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी - विद्यार्थिनीला बाहेरच्या गुंडांकडून मारहाण होते, त्यास १० तास उलटून ही गुन्हा दखल होत नाही. कोणाला अटक होत नाही. पोलिस आयुक्तांना लाज कशी वाटत नाही. मुंबई पेक्षाही पुण्यातील गुंडगिरी मोठी झाली आहे, मात्र पुण्याचे पालकमंत्री इतर ठिकाणी फिरत बसतात, अशी टीका ही आव्हाड यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com