
Ajit Pawar
sakal
पुणे : ‘‘जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यात येणार आहे. त्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येईल. तसेच, बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून साहित्य खरेदीसाठी ४० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिली.