Ajit Pawar
पुण्यात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत बोलताना म्हटलं की, सगळीकडे आज विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला वेळेत सुरुवात व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र अजित पवार यांनी पुण्यात ऐन गणेशोत्सवात झालेल्या हत्या प्रकरणी आणि सोलापूरच्या महिला आयपीएस अधिकाऱ्यासोबतच्या वादावर मौन बाळगलं.