esakal | अजित पवार २४ तासांपासून नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर : चंद्रकांत पाटील

बोलून बातमी शोधा

chandrakant  patil

कात्रज-कोंढवा रस्त्यावर माऊली गार्डन येथे आनंद हॉस्पिटल धनकवडी व कात्रज-कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान संचलित ४० बेड्सचे कोविड केअर सेंटर स्थानिक नगरसेविका मनिषा कदम यांच्या प्रयत्नातून चालू करण्यात आले आहे.

'अजित पवार 24 तासांपासून नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर'
sakal_logo
By
अशोक गव्हाणे

कात्रज : राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळित होत नाही. अशात जिल्ह्याचे पालकमंत्री २४ तासांपासून नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर आहेत. मागील २४ तासांपासून अजित पवार यांच्याशी संपर्क होत नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊली कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, ''सध्या रुग्णांची संख्या खूप वाढत आहे. ते कोणाच्या हातात नाही, अशात काळजी घ्यायला हवी. सध्याची परिस्थिती पाहता या कोविड सेंटरकडून लोकांची चांगली सेवा होईल, अशा शुभेच्छा मी देऊ शकतो, पण हे कोविड सेंटर जास्त काळ चालावे अशा शुभेच्छा मी देणार नाही. ते योग्य नाही.

हेही वाचा: व्यावसायिक वीजग्राहकांच्या वीजदरात महावितरणकडून वाढ

कात्रज-कोंढवा रस्त्यावर माऊली गार्डन येथे आनंद हॉस्पिटल धनकवडी व कात्रज-कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान संचलित ४० बेड्सचे कोविड केअर सेंटर स्थानिक नगरसेविका मनिषा कदम यांच्या प्रयत्नातून चालू करण्यात आले आहे. याठिकाणी ४०पैकी ३० ऑक्सिजन तर १० क्वारंटाईन बेड्सचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांसाठी अल्पदरात ते उपलब्ध करण्यात आले आहेत. यावेळी नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, वृषाली कामठे, नगरसेवक वीरसेन जगाताप, अशोकानंद कंवर महाराज, राजाभाऊ कदम उपस्थित होते.

राज्यसरकारचे महापालिकेला सहकार्य नाही

राज्यसरकार महापालिकेला व्यवस्थित सहकार्य करत नसल्याने रुग्णांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. दोन दिवसांपू्र्वी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने विकासकामाच्या निधीतून ३५० कोटी रुपये बाजूला काढले आहेत. परंतु, ते पैसे अजित पवारांच्या समोर नेऊन ठेवले तर ते आरोग्य सुविधा देऊ शकणार आहेत का? असा प्रश्न करत पाटील यांनी औषधे, ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर यांचा सुरळित पुरवठा व्हायला हवा, अशी मागणी केली.