नानांना जे वाटले, ते बोलून दाखवले; अजित पवार यांची सावध भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 20 February 2021

पुणे महानगरपालिका बरखास्त करा, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘पुरावे असतील, तर त्याच्याबद्दल विचार करता येईल. भ्रष्टाचाराचे पुरावेच समोर आले तर तशी चौकशी होईल.’’

पुणे : ‘‘नानांच्या मनात आले, ते त्यांनी बोलून दाखविले. ते एका महत्त्वाच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना जे योग्य वाटले, ते त्यांनी बोलून दाखविले,’’ अशी सावध भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार मांडली. कॉँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल दरवाढीबाबत ट्विट करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार सध्या पेट्रोलचे दर शंभरीवर पोचले असतानाही गप्प असल्याने त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे विधान पटोले यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर पवार यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले, ‘‘नानांच्या मनात ते आले असेल, ते बोलून गेले. त्यांना जे योग्य वाटतेय ते त्यांनी केले.’’

पोलिस अधिकारी ३५ लाखांच्या गाडीत

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीला आलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याची गाडी ३५ लाख रुपयांची होती. चौकशी केल्यानंतर एका उद्योगपतीने पोलिसांच्या कॅन्व्हायसाठी दिलेल्या गाड्यांपैकी काही गाड्या वरिष्ठ पोलिस अधिकारी वापरत असल्याचे समजले. उद्योगपतीने दिलेली गाडी ड्युटीवर असताना वापरणे योग्य नाही. डयुटीवर असताना शासनाच्या नियमांचे आदर व पालन केलेच पाहिजे, असे पवार म्हणाले.
आणखी वाचा - पासपोर्टसाठी आला डीजीलॉकर

...तर महापालिकेची चौकशी
पुणे महानगरपालिका बरखास्त करा, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘सरकार व महापालिका या दोन्ही वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. त्यांनी कसं काम करावं, हा त्यांचा अधिकार आहे, पालिकेने जर त्यांना घालून दिलेल्या नियमांच्या बाहेर काम केले असेल, तर अशा वेळी नगरविकास विभागाला जाब विचारण्याचा अधिकार सरकारला आहे. पुरावे असतील, तर त्याच्याबद्दल विचार करता येईल. भ्रष्टाचाराचे पुरावेच समोर आले तर तशी चौकशी होईल.’’

आणखी वाचा - पुण्यात पेट्रोलची शंभरी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar react on nana patole Statement Hike in petrol Price