लोणावळ्यात अजित पवार आणि माजी आमदार रूपलेखा ढोरे यांना श्रद्धांजली

लोणावळ्यात अजित पवार आणि माजी आमदार रूपलेखा ढोरे यांना श्रद्धांजली

Published on

​लोणावळा, ता.३१: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळ विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार रूपलेखा ढोरे यांच्या अकाली निधनामुळे एकाच वेळी राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय नेतृत्व हरपल्याने मावळवासीयांना धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली सभा पार पडली.
​या सभेला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा) या सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जमलेल्या जनसमुदायाने दोन्ही दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहिली. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू यांच्यासह विविध नेत्यांनी सभेत बोलताना दोन्ही नेत्यांच्या कार्याला उजाळा दिला.
मावळच्या आमदार म्हणून ढोरे यांनी सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला. येथे सुरू असलेल्या लोणावळा उपजिल्हा रुग्णालयास श्रद्धांजली म्हणून अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी यावेळी आरपीआय (आठवले) यांच्या वतीने करण्यात आली.
​विमान दुर्घटनेत पवार यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच शोक व्यक्त करण्यासाठी देण्यात आलेल्या ‘मावळ बंद’च्या हाकेला लोणावळ्यात प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दोन दिवस दुकाने आणि व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले. नागरिकांनी स्वतःहून बंद पाळून या नेत्यांना आदरांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com