अजित पवारांचे 'कमबॅक'; कोरोना आणि विश्रांतीनंतर पु्न्हा कामाचा धडाका!

Ajit Pawar started daily work after recovery from Corona
Ajit Pawar started daily work after recovery from Corona

बारामती : कोरोनावर मात करुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात कामकाज सुरु केले. आज त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे व सार्वजनिक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनीच फेसबुक लाईव्ह करत हे क्षण सर्वांपर्यंत पोहोचविले.

राज्यभरात कोरोनाच्या काळात अजित पवार यांनी झंझावाती दौरे केले. मुंबई, पुण्यासह बारामती व राज्याच्या विविध भागात त्यांनी बैठकांचे सत्र घेत कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा हलविली होती. त्या नंतर झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठीही पुण्यासह सोलापूर व इतर दौरे त्यांनी केले.या धावपळीत प्रचंड काळजी घेतानाही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्या नंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवडाभर ब्रीच कँडी रुग्णालयात विश्रांती घेतली, त्यानंतर काही दिवस घरूनच कामकाज केले. आज डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर ते मंत्रालयात हजर झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा



दरम्यान, कामकाज सल्लागार समितीची बैठक आटोपून ते पुण्याला व बुंधवारी ते बारामतीत दिवाळीसाठी येणार आहेत. अर्थात अजित पवार यांनी दिवाळीच्या निमित्ताने आयोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असून पाडव्याला गोविंदबागेतील भेटीगाठीचाही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. बारामतीत विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकांना ते उपस्थिती लावणार आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षीच पवार कुटुंबियांना भेटायला दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून खासदार, आमदार, मंत्र्यांसह अनेक दिग्गज हजेरी लावतात, यंदा कोरोनाच्या संकटामुळे पवार कुटुंबियांनी संयुक्त पत्रकाद्वारे हा कार्यक्रम रद्द केल्याचे जाहिर केले आहे.दरम्यान अजित पवारांनी आजपासून कामकाजास सुरवात केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.


"विनामास्क'च्या दंडातून साडेसहा कोटी; पोलिसांना मिळणार निम्मी रक्कम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com