मी तर सगळ्यांनाच भेटतो; खडसेंच्या पक्ष प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया

ajit pawar statement eknath khadse joining ncp
ajit pawar statement eknath khadse joining ncp

पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. घटस्थापनेच्या मूहूर्तावर त्यांचा पक्ष प्रवेश होईल. त्यांना विधानपरिषदेची जागा दिली जाईल आणि राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळेल, अशी चर्चा आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. 

'मी सगळ्यांना भेटतो'
खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती, ती मी तुम्हाला दिली आहे. 
राजकीय जीवनात काम करताना, अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काहीजण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळं बेरं आहे, असं समजू नये. भाजपचं सरकार असताना आम्ही देखील लोकप्रतिनिधी या नात्याने त्या काळातील मंत्र्यांना, नेत्यांना भेटायचो. मी तर सगळ्यांना भेटत असतो, तुम्ही मला कित्येक वर्षे ओळखता.

'कॅगचा अहवाल कधीआला?'
दरम्यान, अजित पवार यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरही प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, 'कॅगचा अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत. मुळात सूडबुद्दीने किंवा जाणीवपूर्वक कोण करणार आहे?  कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला? या सगळ्याकडं कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं. तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं, त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होतं. त्यांनीच तसंच सूतोवाच केलं होतं.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com