Ajit Pawar : अजित पवार बावनकुळेंकडून घेणार राजकीय धडे? "पक्ष बायकोचेही तिकीट कसे नाकारतो", जाणून घेणार!

Ajit Pawar : अजित पवार बावनकुळेंकडून घेणार राजकीय धडे? "पक्ष बायकोचेही तिकीट कसे नाकारतो", जाणून घेणार!

पुणे : बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी एकत्र लढली तर यश नक्की मिळेल. शिंदे-भाजप युतीबाबत लोकांच्या मनात समाधान नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचा पराभव झाला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल, असे वक्तव्य केले होते. यावर अजित पवार म्हणाले, जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो. त्यांचे म्हणणे खरे ठरो.

यावेळी अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील टोला लगावाला. पोस्टर लावून होत नाही, काम करावं लागत, असे बावनकुळे म्हणाले होते. यावर अजित पवारांनी बावनकुळेंना जोरदार चिमटे काढले.

Ajit Pawar : अजित पवार बावनकुळेंकडून घेणार राजकीय धडे? "पक्ष बायकोचेही तिकीट कसे नाकारतो", जाणून घेणार!
Bazar Samiti Election : मतदान सुरू असतानाच राडा; गोपीचंद पडळकरांनी पंचायत सदस्याला लगावली कानशिलात

काय म्हणाले अजित पवार?

"उद्या मुंबईला जातोय. माझा कार्यक्रम संपल्यावर नागपूरला जातो आणि बावनकुळेंना कसे काम करावे लागते विचारतो. काय काम करावं लागतं, कसे काम केल्यावर पक्ष आपल्याला तिकीट देतो?, कसं काम केलं नाही तर तिकीट नाकारतो. आपल्यालाही नाकारतो, बायकोलाही नाकारतो, याची अतिशय चांगल्याप्रकारे मी बावनकुळेंकडून माहिती घेतो. त्यांचा मोलाचा सल्ला घेऊन मला पटला तर तशा पद्धतीने मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो", असा टोला अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

Ajit Pawar : अजित पवार बावनकुळेंकडून घेणार राजकीय धडे? "पक्ष बायकोचेही तिकीट कसे नाकारतो", जाणून घेणार!
'जनतेवर अन्याय व्हावा, असं सरकारला वाटत नसतं'; बारसु प्रकल्पावर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com