सात वाजता उठायचं नाही, कामाला लागायचं; अजित पवारांचा आव्हाडांना टोला

सकआळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पुण्यात आज, झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळी उपस्थित राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांना अजित पवार यांनी चिमटे काढले. अजित पवार म्हणाले, 'सूर्यमुखी असणाऱ्यांनी जरा लवकर उठायची सवय लावून घ्या. जितेंद्र तू 7 ऐवजी पहाटे 4 ला ठाण्यातून निघायला हवं होतं. सात वाजता उठायचं नाही, तर सात वाजता कामाला लागायचं असतं.' टीडीआरच्या बाबतीत पुण्याची मुंबईशी बरोबरी होऊ शकत नाही, दोन्ही शहरांची परिस्थिती वेगवेगळी आहे, असं सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांचा मुद्दा खोडून काढला. 

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे त्यांच्या सकाळी लवकर उठून काम सुरू करण्याच्या सवयीविषयी कायम चर्चेत असतात. त्यांनी ही सवय आता अधिकाऱ्यांनाही लावली आहे. या सकाळी लवकर उठण्याच्या सवयीवरून त्यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावलाय. 

पुण्यातील चुकलेल्या उड्डाणपुलांचं करायचं काय? अजित पवार म्हणाले...

काय म्हणाले अजित पवार?

पुण्यात आज, झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळी उपस्थित राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांना अजित पवार यांनी चिमटे काढले. अजित पवार म्हणाले, 'सूर्यमुखी असणाऱ्यांनी जरा लवकर उठायची सवय लावून घ्या. जितेंद्र तू 7 ऐवजी पहाटे 4 ला ठाण्यातून निघायला हवं होतं. सात वाजता उठायचं नाही, तर सात वाजता कामाला लागायचं असतं.' टीडीआरच्या बाबतीत पुण्याची मुंबईशी बरोबरी होऊ शकत नाही, दोन्ही शहरांची परिस्थिती वेगवेगळी आहे, असं सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांचा मुद्दा खोडून काढला. 

सात वाजता उठायचं नाही, कामाला लागायचं; अजित पवारांचा आव्हाडांना टोला 

अधिकाऱ्यांना प्रेमळ दमबाजी

कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांना प्रेमळ दमबाजी केली. ते म्हणाले, 'काम चांगलं झालं तर, किरकोळ चुकाही पोटात घेऊ. पण, कामं झाली नाहीत तर साईड पोस्टिंगचा पर्याय वापरू, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. अधिकाऱ्यांनी फार नियमांवर बोट ठेऊन चालू नका, त्यातून व्यवहारी मार्ग काढा, मी तर आता झोपूंच्या प्रकल्पांचा दर आठवड्यालाच आढावा घेणार आहे.' 

चीनचा प्रवासी पुण्यातील रुग्णालयात दाखल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar taunt Jitendra Awhad On the habit of getting up early in the morning at Pune