पुण्यात हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी; दहा लाखांच्या खंडणीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

खंडणी उकळण्यासाठी हा मेल केला असावा असा पोलिसांचा संशय आहे. पोलिस उपायुक्त सुहास बावचे हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पुणे : ''दहा लाख रुपयांची खंडणी दिली नाही तर, 500 ग्राम आरडीएक्स नोबल रुग्णालयात ठेवला जाईल''असा मेल आल्याने खळबळ उडाली. शनिवारी मध्यरात्री पर्यंत सायबर सेल व बॉम्ब शोधक पथकाने रुग्णालयाची तपासणी केली मात्र, कोठेही अरडीएक्स मिळून आले नाही.

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; रॅलीला परवानगी नाकारली

खंडणी उकळण्यासाठी हा मेल केला असावा असा पोलिसांचा संशय आहे. पोलिस उपायुक्त सुहास बावचे हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी घटनास्थळी भेट दिली. ईमेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सायबर सेलच्या मदतीने सुरू आहे.दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चीनचा प्रवासी पुण्यातील रुग्णालयात दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatened to keep RDX at Noble Hospital for Rs 10 lakh rupees ransom

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: