esakal | रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल....
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar.jpg

शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरुन रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या अधिका-यांना दिल्या. अनेकदा सूचना देऊनही ही कामे सुरु होत नसल्याबद्दल आज अजित पवार यांनी आपल्या शैलीत अधिका-यांना खडे बोल सुनावले. 

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल....

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरुन रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या अधिका-यांना दिल्या. अनेकदा सूचना देऊनही ही कामे सुरु होत नसल्याबद्दल आज अजित पवार यांनी आपल्या शैलीत अधिका-यांना खडे बोल सुनावले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रस्त्याबाबत सर्वच स्तरातून नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज अधिका-यांची झाडाझडती घेतली. निधी उपलब्ध करुन देऊनही वेळेत कामे सुरु का होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. दिवाळीपर्यंत सर्व रस्त्यांची कामे तातडीने सुरु करुन पूर्ण करा, असे आदेशच त्यांनी दिले. बारामती नगरपालिका हद्दीतील रस्ते नगरपालिकेने, जिल्हा परिषद हद्दीतील रस्ते जिल्हापरिषदेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या हद्दीतील रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे पवार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान बारामती नगरपालिकेतील डांबरीकरण व कॉंक्रीटीकरणाच्या 82 कामांच्या तीन निविदांना मंजूरी मिळाली असून या सर्व कामांच्या वर्क ऑर्डर संबंधित कंत्राटदारांना दिलेल्या असून ही कामे काही ठिकाणी सुरु झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिली. जवळपास 14 कोटी रुपयांची ही सर्व कामे आहेत. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, बारामती शहरासह तालुक्यातही जेथे रस्त्यांची पावसाने व इतर कारणांनी दुरवस्था झालेली आहे, त्या रस्त्यांची डागडुजीही अजित पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने सुरु करणार असल्याचेही बारभाई म्हणाले. बारामती तालुक्यातील विविध ठिकाणच्या पुलांचीही मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीने हानी झाली आहे. त्याची कामेही प्रस्तावित करण्यात आली असून तीही सुरु केली जाणार आहेत.