अजित पवार यांचे इंदापूर तालुक्यात वाढते दौरे

Ajit Pawar
Ajit Pawar

शेटफळगढे - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर तालुक्‍याच्या दौऱ्यावर येत आहेत. पवार यांचा या पूर्वी ८ ऑगस्टला दौरा झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर हा दौरा होत आहे. या दोन महिन्यांत तालुक्‍यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून, त्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या दौऱ्याला महत्त्व असून, पवार काय बोलतात, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

यापूर्वी अजित पवार हे जाचक वस्ती येथील कार्यक्रमानिमित्त आठ ऑगस्टला इंदापुरात आले होते. त्यानंतर तालुक्‍यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. यात प्रामुख्याने इंदापुरातील काँग्रेसच्या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांनी विधानसभेच्या जागेवर सांगितलेला हक्क, विरोधी पक्षाचा आमदार असूनही दत्तात्रेय भरणे यांनी तालुक्‍याच्या विकासासाठी आणलेला कोट्यवधीचा निधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेच्या निवडीवरून झालेले वादंग, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप यांनी दिलेला राजीनामा, जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची केलेली घोषणा याचा त्यात समावेश आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कळस, डाळज, न्हावी येथील कार्यक्रमांच्या निमित्ताने होणाऱ्या सभेत पवार काय बोलतात? पक्षातील तसेच विरोधातील कोणत्या नेत्याला कानपिचक्‍या देतात. याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

राजकीय गणित काय?
अजित पवार हे एप्रिलअखेर अंथुर्णे येथे, जूनमध्ये राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी इंदापूर येथे, त्यानंतर ८ ऑगस्टला जाचक वस्ती येथे आले होते. यानंतर १७ ऑगस्टला येणार होते. पण हा दौरा अचानक रद्द झाला. आता पाच ऑक्‍टोबरला पवार तालुक्‍यात पुन्हा येत आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढत्या इंदापूर तालुक्‍याच्या दौऱ्यामागे कोणते राजकीय गणित दडलंय? याबाबत उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com