राजीनाम्यानंतर अजित पवारांनी केले 'हे' ट्विट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार म्हणतात, 'आज, मुंबईत आदरणीय साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! राजकीय हेवेदावे असले तरी, सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर, दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील, याची खात्री आहे'.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (ता.27) अचनाकपणे राजीनामा दिला आहे. या राजीनामा नाट्यानंतर मात्र अजित पवार हे नॉट रिचेबल येत असले तरी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आले आहे.

अजित पवार राष्ट्रवादी सोडणार नाहीत

ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार म्हणतात, 'आज, मुंबईत आदरणीय साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! राजकीय हेवेदावे असले तरी, सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर, दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील, याची खात्री आहे'.

दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना केला होता फोन

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अजित पवार यांनी राजीनामा दिला, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली असल्याचेही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar tweeted this tweet after his resignation