अजित पवारांची कीर्तन महोत्सवाला भेट.

मिलिंद संधान
गुरुवार, 31 मे 2018

नवी सांगवी(पुणे) : पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पिंपळे गुरव येथील कीर्तन सोहळ्यात हजेरी लावली. कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने अधिकमास व पुरूषोत्तम पर्वकाळ निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. रामकृष्ण मंगल कार्यालयात सोमवार ( ता. 4 ) पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महिला भजन, संध्याकाळी कीर्तन व रात्री जागर हे धार्मिक उपक्रम चालु आहेत. 

काल अजित पवार हे निळुभाऊ नाट्यगृहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी आले होते. बैठक संपल्यानंतर माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी त्यांना सप्ताहाबद्दल माहिती दिली व कीर्तनाला येण्याची विनंती केली. पवार हे ही विनंतीला मान देत राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, अतुल शितोळे, शाम जगताप यांच्यासमवेत रामकृष्ण मंगल कार्यालय पोहचले. त्याच वेळी प्रमोद महाराज जगताप यांचे कीर्तन चालु होते. पवार यांनीही काही काळ कीर्तनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर कीर्तनकार जगताप व माजी नगरसेवक जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कीर्तनकार जगताप यांनी वारी मार्ग चौपदरी केल्याबद्दल अजित पवार यांना धन्यवाद दिले. 

Web Title: ajit pawar visit to keertan mahotsav