esakal | काळजी घेतली नाहीतर...; अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar warns Baramati citizen that tough decisions if no precaution for corona

बारामतीतही टेस्टिंगची संख्या वाढायला हवी अशा सूचना पवार यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिल्या. अनेक जण बिनधास्त विनामास्क फिरत आहेत, अशांवर प्रशासनाने आता कारवाई करायला हवी असे निर्देशही त्यांनी दिले. एकदम उद्रेक झाला तर कठोर निर्णय घ्यायला लागतील, असेही पवार म्हणाले. 

काळजी घेतली नाहीतर...; अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : राज्यात कोरोनाच संकट पुन्हा दाट होतय, लोकांनी कमालीची काळजी घ्यायला हवी, अन्यथा पुन्हा काही कठोर निर्णय नाईलाजाने घ्यावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा दिला. येथील बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत बोलताना अजित पवार यांनी हा इशारा दिला. 

ते म्हणाले, कोरोना पळून गेल्यासारखे मुक्तपणे लोक वावरत आहेत, मास्कचा वापर न करणे, सॅनेटायझर्सचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, शासनाने गर्दीबाबत दिलेल्या सूचनांचे पालन न करणे अशा बाबी सर्रास घडत आहेत. एकदा कोरोना झाला की पुन्हा कोरोना होणारच नाही, अशा समजूतीत राहू नका, दोनदा नाही काहींना तर तीनदा कोरोना झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्या मुळे प्रत्येकाने काळजी घ्यायलाच हवी.

आणखी वाचा - पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार

बारामतीतही टेस्टिंगची संख्या वाढायला हवी अशा सूचना पवार यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिल्या. अनेक जण बिनधास्त विनामास्क फिरत आहेत, अशांवर प्रशासनाने आता कारवाई करायला हवी असे निर्देशही त्यांनी दिले. एकदम उद्रेक झाला तर कठोर निर्णय घ्यायला लागतील, असेही पवार म्हणाले. 

दंडाची रचना रविवार ठरवणार...
मास्क न वापरण्यासह इतर नियमांचे पालन न करणा-याबाबत पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील दंडाची रचना रविवारी पुण्यात होणा-या बैठकीत निश्चित करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सर्वांनी मास्कचा वापर अनिवार्यपणे करा, कारवाईची वेळ येऊ देऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले. राज्य सरकार या बाबत सतर्क आहे मात्र लोकांनी शासनाच्या प्रयत्नांना साथ देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा